मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता त्यांनी किरीट सोमय्या प्रकरणी मुंबईला गेल्यानंतर ह्याची माहिती घेऊन सांगेन असे ते म्हणाले. पुण्यातील बालेवाडी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. (deputy chief minister Ajit Pawar’s reaction on bjp leader Kirit Somaiya)