Ajit Pawar | मी फुशारकी मारणार नाही, पण…अजित पवार मुख्यमंत्र्यांसमोर असं का म्हणाले?
Namo Maharojgar Melava 2024 Baramati | "आज बारामतीमध्ये नंबर 1 च बस स्थानक उभ केलं. करायच तर काम एक नंबर, नाहीतर भानगडीत पडायच नाही" असं अजित पवार म्हणाले. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्री पवारही मंचावर आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांच लक्ष आहे.

Namo Maharojgar Melava 2024 Baramati | बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्री पवारही मंचावर आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांच लक्ष आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत. कार्यक्रमाला थोडा उशिर झाल्याबद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. राज्यात होणाऱ्या या नमो महारोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळत असल्याच अजित पवार म्हणाले. मराठवाडा, लातूर इथे झालेल्या नमो महारोजगार मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा या पाच जिह्यांचा मेळावा बारामतीमध्ये होतोय असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार या मेळाव्यात भाषण करताना फक्त बारामतीच्या विकासाबद्दल बोलले. त्यांनी कुठल्याही राजकीय मुद्यावर भाष्य केलं नाही. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर्मनीसोबत करार केलाय. जर्मनीला पाच लाख मुला-मुलींची गरज आहे. फक्त जर्मन भाषा आली पाहिजे अशी त्यांची अट आहे. आपल्या देशात, राज्यात, परदेशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. पण फक्त संधीच सोन करता आलं पाहिजे” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी कुठली इच्छा व्यक्त केली?
“मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी स्क्रिनवर जी काम पाहिली, ती त्यांनी प्रत्यक्ष येऊन पहावी अशी माझी इच्छा होती” असं अजित पवार म्हणाले. “बराणपूरला 66 एकर जागा पडून होती. तिथल्या जनतेला विश्वासात घेतलं आणि 132 कोटी रुपये खर्चून पोलीस उपमुख्यालय उभारलं” असं अजित पवार म्हणाले.
फुशारकी नाही मारणार असं अजित पवार का म्हणाले?
“आज बारामतीमध्ये नंबर 1 च बस स्थानक उभ केलं. करायच तर काम एक नंबर, नाहीतर भानगडीत पडायच नाही” असं अजित पवार म्हणाले. “राज्य सरकारच्या मदतीने बारामतीमध्ये चांगल्या वास्तू उभ्या केल्या. अजून अनेक काम पाइपलाइनमध्ये आहेत, त्यासाठी राज्य सरकारच सहकार्य लागेल” असं अजित पवार म्हणाले. “मी फुशारकी नाही मारणार, पण पायाभरणी झाल्यानंतर मी प्रत्येक इमारतीच काम सुरु असताना तिथे 40 वेळा जाऊन भेट दिलीय” असं अजित पवार म्हणाले. विकासाच्या बाबतीत बारामतीला एक नंबरचा तालुका बनवीन अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली.
