AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारचा महाविकास आघाडी सरकारला दणका, विकास आराखड्यांना स्थगिती; तर मुख्यमंत्री म्हणतात…

राज्यातील विकास आराखड्यांना नव्या सरकारने ब्रेक लावला. त्यावर शिंदे म्हणाले, की राजकीय आकसापोटी कोणत्याही निर्णयांना ब्रेक लावणार नाही. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याचे पत्र उपलब्ध झाले आहे.

Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारचा महाविकास आघाडी सरकारला दणका, विकास आराखड्यांना स्थगिती; तर मुख्यमंत्री म्हणतात...
एकनाथ शिंदे/देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
| Updated on: Jul 04, 2022 | 7:05 PM
Share

मुंबई : सर्वच विकासकामांना ब्रेक लावणार नाहीत. घाईगडबडीत मजूर झाले प्रस्ताव स्थगित करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. ते मुंबईत अधिवेशन संस्थगित झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आमचे सरकार नियमानुसार काम करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. राज्यात नवे सरकार आल्यापासून आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला ब्रेक लावण्याचा धडाका लावला आहे. त्यावर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र काही निर्णय सरकारने घेत विकास आराखड्यांना ब्रेक लावला आहे. एक एप्रिलनंतरच्या विकास आराखड्यांना या सरकारने स्थगिती दिली आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्रही पाठवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हा मोठा दणका या सरकारने दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘आकसापोटी स्थगिती देणार नाही’

राज्यातील विकास आराखड्यांना नव्या सरकारने ब्रेक लावला. त्यावर शिंदे म्हणाले, की राजकीय आकसापोटी कोणत्याही निर्णयांना ब्रेक लावणार नाही. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याचे पत्र उपलब्ध झाले आहे. पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यावर मंजूर कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे स्थगितीची मागणी केली होती, त्यानुसार ही स्थगिती देण्यात आली आहे.

काय आहे विजय शिवतारेंची मागणी?

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यास स्थगिती तसेच नवीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निधीचे फेरवाटप करण्यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिले. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 875 कोटींच्या विकास आराखड्यास राष्ट्रवादीच्या सदस्यांना निधीचे बेसुमार वाटप करून शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांना अत्यंत नगण्य निधी देण्यात आला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

lett

विजय शिवतारेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र

‘जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावे’

20 जूननंतर राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाल्यानंतरदेखील अनेक सदस्यांच्या याद्या अत्यंत घाईने मागवण्यात आल्या आणि त्यांना मान्यता देण्यात आली. नाशिक जिल्ह्यात असाच प्रकार घडल्यानंतर आपण स्थगितीचे आदेश दिले होते. त्यामुळे आपणास विनंती आहे, की पुणे जिल्ह्याच्या आराखड्यासदेखील स्थगिती देऊन नवीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निधीचे समन्यायी पद्धतीने फेरवाटप करण्यात यावे, यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.