AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 21जागांसाठी तब्बल 299अर्ज ; असा आहे निवडणूक कार्यक्रम

भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या विद्यमान संचालकांसह अन्य सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.  

जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 21जागांसाठी तब्बल 299अर्ज ; असा आहे निवडणूक कार्यक्रम
PDCC election
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 07, 2021 | 2:26 PM
Share

पुणे- ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिगुल वाजले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांच्या 21जागांसाठी 299 उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

 एवढ्या जागांसाठी होणार निवडणूक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. आठ मतदार संघातील तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. बँकेच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सोसायटी अ वर्ग गटासह यावेळी अन्य सर्व गटांमध्ये चुरस आहे. भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या विद्यमान संचालकांसह अन्य सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

– उमेदवारी अर्ज मागे घेणे : 8 डिसेंबर ते 22 डिसेंबर

– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022

– मतमोजणी : 4 जानेवारी 2022

बँकेचे संचालक मंडळ : 21

– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13

– ब मतदार संघ : 1

– क मतदार संघ : 1

– ड मतदार संघ : 1

– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1

– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1

– विभक्त जाती व प्रजाती : 1

– महिला प्रतिनिधी : 2

नियमाचा गैरवापर या सगळ्या गोष्टी सुरु असताना नवीन सहकार कायद्यानुसार किती अर्ज भरावे याला मर्यादा नाहीत. या नियमाचा गैरफायदा घेत जुन्नर तालुक्यातील विद्यमान संचालक, माजी उपाध्यक्ष संजय काळे यांनी चक्क 55 उमेदवारी अर्ज विकत घेऊन तब्बल 34 उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे.

पावसाची उघडीप तरीही द्राक्ष बागा धोक्यातच, काय आहे शेतकऱ्यांसमोरील नवे संकट?

ST Workers Strike : ‘हिटलरशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, चर्चा करून प्रश्न सोडवावा’

Video: गुडघाभर पाण्यात सूर मारायला गेला, आणि तोंडावर आपटला, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल!

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!