AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार, ईडीचे पथक पुन्हा कोल्हापुरात

काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी तब्बल अकरा तास मुश्रीफांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती

हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार, ईडीचे पथक पुन्हा कोल्हापुरात
Image Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 18, 2023 | 10:41 AM
Share

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी अंमलबजावणी संचालयाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Kolhapur District Bank) काही आजी माजी संचालकांची चौकशी केली होती. ईडीने (ed) जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा ईडीचे पथक कोल्हापुरात पोहचले आहेत. या पथकाने तीन माजी संचालकांची चौकशी सुरु केली आहे. सर्जेराव पाटील पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे अशी त्यांची नावे आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी तब्बल अकरा तास मुश्रीफांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. ईडी अधिकारी त्यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे घरातून घेऊन गेल्याची माहिती समोर आली होती.

बँकेत तपासणी

मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेतही धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर थेट पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या चौकशीमुळे कर्मचारी तणावात होते. बँकेत काम करत असताना सुनील लाड या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता.

तिघांची चौकशी सुरु

ईडीचे पथक शनिवारी कोल्हापुरात पोहचले. या पथकाने तीन माजी संचालकांची चौकशी सुरु केली आहे. सर्जेराव पाटील पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे अशी त्यांची नावे आहेत. ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणात तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर तिघांना ईडीने समन्स बजावले आहे.

मुलांच्या जमीनला विरोध

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. यावर ईडीने त्यांच्या जामीन अर्जावर विरोध केला. अटकपूर्व जामीन दिला तर तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत ईडीने विरोध केला.

विरोधकांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या आरोपांना भारतीय जनता पक्षाकडून कर नाही तर डर कशाला? असे सागंत उत्तर दिले जात आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच