AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिध्द देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल; इतकी आहे किंमत?

सिंधुदुर्गमधील उत्तम फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. फोंडेकर यांनी बागेत जूनच्या शेवटच्या आठवड्यात आलेला मोहोर टिकवून ठेवून त्यावर फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया केली. अतिवृष्टीच्या काळात योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर मोहोर टिकवून फळांचे संरक्षण केले. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या सल्ल्याने विविध कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या एकूण सहा झाडांवरील फळाची काढणी केली

प्रसिध्द देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल; इतकी आहे किंमत?
Devgad Hapus
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 6:19 PM
Share

पुणे- यंदाच्या हंगामातील प्रसिध्द देवगड हापूसची आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल झाली आहे. आंब्याचा मौसम सुरू होण्यास अद्याप दोन- तीन महिने बाकी आहेत. तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुंभारमाठ येथून हापूसची आंब्याची पेटी पुण्याला रवाना झाली आहे. शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी ही पहिली देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठविली आहे.

पाच-पाच डझनच्या दोन पेट्यांना प्रति प्रतिपेटी १८ हजार रुपयाला त्याची विक्री झाली आहे. या हंगामातील पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी मिळवला असून कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान हा तिसऱ्यांदा  मिळविला आहे.  सिंधुदुर्गमधील उत्तम फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. फोंडेकर यांनी बागेत जूनच्या शेवटच्या आठवड्यात आलेला मोहोर टिकवून ठेवून त्यावर फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया केली.

अतिवृष्टीच्या काळात योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर मोहोर टिकवून फळांचे संरक्षण केले. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या सल्ल्याने विविध कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या एकूण सहा झाडांवरील फळाची काढणी केली. सहा ते सात झाडांवर आलेल्या हापूस आंबाच्या दोन पेट्यां आंबा त्यांना मिळाला. हा आंबा त्यांनी पुणे येथील ग्राहकाला पाठवला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० ते २५ दिवस अगोदरच पहिली पेटी बाजारपेठेत आली आहे.

यावेळी अतिवृष्टी आंब्याचा मौसम सुरुवात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा आंब्याच्या किंमती वर- खाली होतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही; राणेंची जोरदार बॅटिंग

शेतकऱ्यांचा कृषी कायद्याला विरोध सुरूच, हरयाणात माजी मंत्र्यासह भाजपचे नेते ओलीस, वाहनांची हवाही काढली

केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Follow Us
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!