कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींकडे मागणी

त्यत बेजबाबदार, निराधारपणे  स्वातंत्र्य योद्ध्यांचा अपमान करणारे विधान कंगना राणावत यांनी केलेलं आहे, याचा मी निषेध करते, प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली, बेतालपणे वक्तव्य करणारी कंगना राणावतच्या स्टेट्में मधून १९४७ च्या स्वातंत्र्य युद्धाता आपले जीवन समर्पित केले ,त्यांचा आपण केला आहे.

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींकडे मागणी
कंगना.

पुणे – आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं कायम चर्चेत अभिनेत्री कंगना रणोतने पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. कंगनाने “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहित होतं. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवं. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हतं ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळालं ते २०१४ सालामध्ये मिळालं” असे मुक्ताफळे उधळली आहेत.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही कंगनाचा खरपूस समाचार घेतला आहे.  अंत्यत बेजबाबदार, निराधारपणे  स्वातंत्र्य योद्ध्यांचा अपमान करणारे विधान कंगना राणावत यांनी केलेलं आहे, याचा मी निषेध करते, प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली, बेतालपणे वक्तव्य करणारी कंगना राणावतच्या स्टेट्मेंट मधून १९४७ च्या स्वातंत्र्य युद्धाता आपले जीवन समर्पित केले ,त्यांचा आपण केला आहे. त्या लढ्याचा अपमान केला आहे. त्याच्यामुळं कंगनाचा पद्म पुरस्कार तात्कळ रद्द करण्यात यावा. तसेच कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

दुसरीकडे कंगनाच्या  या वक्तव्याचा देश भारावून निषेध केला जात आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी कंगनाच्या विरोधात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या बेताल वक्तव्या प्रकरणी कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

औरंगाबादध्ये ED चे छापेः व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई

कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र

VIDEO: संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

Published On - 8:22 pm, Thu, 11 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI