अंनिसच्या मागणीला यश, अखेर पुण्यातील कथित गुरू येमुलवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या मागणीला यश आलंय. पुणे पोलिसांनी पुण्यातील बाणेरचा कथित गुरू रघुनाथ येमुल याच्यावर अंनिस, शिवाजीनगर पुणे शाखेच्या मागणीनुसार जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय.

अंनिसच्या मागणीला यश, अखेर पुण्यातील कथित गुरू येमुलवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल
राजकीय गुरु रघुनाथ येमूल
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 12:59 AM

पुणे : अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या मागणीला यश आलंय. पुणे पोलिसांनी पुण्यातील बाणेरचा कथित गुरू रघुनाथ येमुल याच्यावर अंनिस, शिवाजीनगर पुणे शाखेच्या मागणीनुसार जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. आरोपी रघुनाथ येमुलने सांगितल्यानुसार संबंधित पीडित महिलेशी कुटुंबीय नातेवाईक यांनी जादूटोणा प्रकार केला होता. तसेच कुटुंबीय नातेवाईक यांनी त्या महिलेला शारीरिक, मानसिक त्रास, शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर, आर्थिक पिळवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.

यानुसार येमुल याच्यासह 9 आरोपींच्या विरोधात पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान संहिता, कलम 498 अ आदी कलमाद्वारे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना अटक झाली. मात्र या प्रकरणात जादूटोणा प्रकार झाल्याचे महाराष्ट्र अंनिसने निदर्शनास आणू दिले. महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने संबंधित आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी संबंधित आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

“पोलिसांनी लोकांना संबंधित गुरू विरोधात तक्रार देण्यासाठी आवाहन करावे”

महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचे कार्यकर्ते विशाल विमल, सचिन नेलेकर, प्रवीण खुंटे, संदीप कांबळे, लालचंद कुवार, सम्यक वि. म., वनिता फाळके, रविकिरण काटकर आदी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पोलिसांनी कठोरपणे तपास करून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. तथाकथित गुरूने याही अगोदर अनेकांना अशाप्रकारे अंधश्रद्धेचे प्रकार करून फसविले असणार आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रसारमाध्यमांद्वारे फसवणूक झालेल्या लोकांना संबंधित गुरू विरोधात तक्रार देण्यासाठी आवाहन करावे, अशी मागणी अंनिसने केली.

“तक्रार करणाऱ्या पीडित महिलेचं आणि आरोपींवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन”

या प्रकरणावर बोलताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “ज्योतिषशास्त्र विषारद असल्याता दावा करणाऱ्या येमुल गुरुजी नावाच्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. हे प्रकरण अतिशय गंभीर प्रकारचं आहे. एका राजकीय नेत्याला यशस्वी होण्यासाठी बायकोला पांढऱ्या पायाची म्हणत लिंबू मिरची उतरवायला लावलं. त्यातून कौटुंबिक हिंसाचारही घडला. पुणे पोलिसांचं पहिल्यांदा आरोपींवरील कारवाईसाठी अभिनंदन. ज्या पीडित महिलेने ही तक्रार नोंदवली तिचंही आपण अभिनंदन करायला पाहिजे.”

“असं शोषण झालेल्यांनी पोलिसांशी किंवा अंनिसशी संपर्क साधावा”

“या प्रकरणात एकाचवेळी भविष्य आणि दुसऱ्या बाजूला भोंदूगिरी, जादुटोणा यासारख्या गोष्टी एकत्रित झाल्यात. यात महिलेचं शोषण झालंय. त्यामुळे या प्रकरणात जादुटोणा कायद्याची कलमं देखील लावली जावीत अशी मागणी अंनिसकडून करण्यात आली. एका बाजुला शासन ज्योतिषासारखे अभ्यासक्रम इग्नूसारख्या प्रतिष्ठीत विद्यापीठात सुरू करतंय. त्यामुळे लोकांच्या शोषणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. अशा शोषणाला बळी पडलेली कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांनी नक्की पोलिसांशी किंवा अंनिसशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळेल यासाठी आपण प्रयत्न करु,” असंही दाभोलकर यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

कथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी

पुण्याचा गणेश गायकवाड नेमका कोण आहे जो तथाकथित बाबामुळे चर्चेत आलाय

कोण आहे राजकीय गुरु रघुनाथ येमूल ज्याला नेत्याच्या बायकोनं कोठडीची हवा खाऊ घातलीय?

व्हिडीओ पाहा :

FIR against Raghunath Yemul under Maharashtra Anti Superstition law in Pune

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.