AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या ‘या’ निर्णयाचे संभाजीराजेंकडून स्वागत, ट्विट करत म्हणाले…

अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

सरकारच्या 'या' निर्णयाचे संभाजीराजेंकडून स्वागत, ट्विट करत म्हणाले...
| Edited By: | Updated on: Nov 10, 2022 | 7:41 PM
Share

मुंबईः सध्या राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घटनांना प्रचंड वेग आला आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यामुळेही राजकीय घडामोडींना आला आहे. तर दुसरीकडे प्रतापगडाच्या पायथ्याजवळ असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अनाधिकृत बांधकाम काढल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

त्याबद्दल त्यांनी आणखी काही बांधकाम असलेली या सरकारने काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबतचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत सरकारच्या कामाचे स्वागत केले आहे.  त्याचबरोबर त्यांनी ट्विटही केले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावरील अनाधिकृत बांधकाम हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हणाले की, अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे.

याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत अशी मागणीही त्यांनी केली आहेत.

माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही त्यांनी इतिहासाची मोडतोड करणाऱ्याविरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला.

त्यानंतर संभाजीराजे यांनी शिंदे-फडणवीस सरकारने प्रतापगडावरील अनाधिकृत बांधकाम हटवल्याप्रकरणी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत, त्यांनी इतर गडकोटावर असलेली अनाधिकृत बांधकामं हटवावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून राजकीय प्रश्नांबरोबरच मराठा आरक्षणाचा मुद्दाही लावून धरला होता. त्यानंतर त्यांनी त्यांनी इतिहासावर आधारित असलेल्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखवण्यात येणाऱ्या प्रतिमांविषयीही त्यांनी ठोस भूमिका घेत आपले मत मांडले होते.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.