AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे बिल्डर आत्महत्या : माजी आमदार रवींद्र धंगेकर पती-पत्नीला अटकपूर्व जामीन

शिवसेनेचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांना अखेर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पुणे बिल्डर आत्महत्या : माजी आमदार रवींद्र धंगेकर पती-पत्नीला अटकपूर्व जामीन
ravindra dhangekar granted anticipatory bail
| Updated on: Jul 23, 2026 | 7:34 PM
Share

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने अलिकडेच समाजमाध्यमावर व्हिडीओ व्हायरल करुन नंतर जीवन संपवले होते.या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदे यांचे शिलेदार माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सह १३ ते १४ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आता सत्र न्यायालयाने माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबाने गुन्हा दाखल केला आहे.

पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी त्यांची बिल थकल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवल्याचे प्रकरण घडले होते.  या प्रकरणात त्यांनी आधी व्हिडीओ व्हायरल करुन आपण जीवन का संपवत आहोत ? याचा खुलासा केला होता. या बांधकाम प्रकल्पात चार जण होते. त्या चारही पार्टनरने आपली बिले थकवल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे खलिल शेख यांनी या व्हिडीओत म्हटले होते.

या संदर्भात वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले की बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात खोटे गोवण्यात आल्याने माझ्या अशिलाला अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी मागणी आम्ही माननीय न्यायालयाला केली होती. रवींद्र धंगेकर यांना केवळ नाहक अडकविण्यासाठी गुन्हा दाखल केला गेला होता. रवींद्र धंगेकर यांचा या गुन्ह्यात संबंध असल्याचा कोणताही पुरावा पोलीस कोर्टासमोर आणू शकले नाहीत असेही धंगेकर यांची बाजू मांडणाऱ्या वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळा शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळला आहे. या प्रकरणातील एक प्रकरण वगळता इतर सर्व जणांना अटक पूर्व जामीन मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी माझी  पत्नी या प्रकल्पातून कधीच बाहेर पडली आहे. तरीही आम्हाला याचा त्रास होतो आहे. त्रास होतो म्हणूनच आपण शिवसेनेत आलो , पण आता येथेही त्रास होत असल्याची खंत मांडली होती.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल