Rajesh Tope: आरोग्य विभागाच्या ‘ड’ वर्गाची परीक्षा आम्ही पुन्हा घेणार; कोरोनाविषयीही राजेश टोपेंचं गंभीर विधान

आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आश्वासन दिले आहे. त्याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम अहवाल काय येणार आहे ते महत्वाचे आहे.

Rajesh Tope: आरोग्य विभागाच्या 'ड' वर्गाची परीक्षा आम्ही पुन्हा घेणार; कोरोनाविषयीही राजेश टोपेंचं गंभीर विधान
आरोग्य विभागाची ड वर्गाची परीक्षा पुन्हा घेणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 6:37 PM

पिंपरी चिंचवडः कुठेही कोरोनाची (Corona) चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही, मात्र सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली असून, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली असल्याचे दिसत आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. त्यामध्ये रुग्ण गंभीर नाहीत व रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील असा अनुमान काढण्यात आले असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाच्या परीक्षेविषयी (Health Department Exam) बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही ड वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार असून चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर याविषयीचा निर्णय सांगितले जाईल असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून सखोल चौकशी

आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आश्वासन दिले आहे. त्याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम अहवाल काय येणार आहे ते महत्वाचे आहे. तसेच ड वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

या आरोग्य विभागाच्या भरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन त्यांचेही मत यामध्ये विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे या विभागातील होणाऱ्या दोन्हीही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगून असा मंत्री मंडळाचा निर्णयही असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचादेखील निर्णय यामध्ये झाला आहे आहे असेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयातील फोटो सेशन चुकीचे

यावेळी त्यांनी नवनीत राणा आणि रुग्णालयातील फोटो सेशनविषयीही आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, सिटी स्कॅन, एमआरआयच्या ठिकाणी जाऊन फोटो काढणे ही पद्धत मी आरोग्य मंत्री असताना कुठेच पाहिली नाही. रुग्णालयात या प्रकारचे फोटो सेशन करुन रुग्णालय प्रशासनाला अंधारात ठेऊन असे फोटो काढणे आणि हे जरी दुसऱ्या कोणी केले असले तरी फोटो काढणे हा प्रकार चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील किडनी रॅकेट

पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाने यामध्ये स्थगिती दिली आहे. या कारवाईला स्थगिती दिली असून आमच्याकडे त्यांची सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी आणखी आठ दिवस लागणार असून या प्रकरणी सगळ्या बाजूंची माहिती घेऊन योग्य तो निकाल दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.