AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar : तुमच्या मंत्र्यांने दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला तो पैसा अहिल्यादेवींसाठी वापरता का? रोहित पवारांना गोपीचंद पडळकरांचा सवाल

त्यांनी अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) जयंतीवरून आणि रोहित पवारांच्या पत्रिका वाटण्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुघल वृत्तीच्या पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.

Gopichand Padalkar : तुमच्या मंत्र्यांने दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला तो पैसा अहिल्यादेवींसाठी वापरता का? रोहित पवारांना गोपीचंद पडळकरांचा सवाल
गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरलीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 30, 2022 | 12:07 AM
Share

बारामती : पवार घराणं (Sharad Pawar) हे नेहमीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या टार्गेटवर असतं. पवारांवर टीका करण्याची एकही संधी गोपीचंद पडळकर एकही संधी सोडत नाहीत. आज ते बारामतीत बोलत होते. तेव्हाही त्यांनी अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) जयंतीवरून आणि रोहित पवारांच्या पत्रिका वाटण्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुघल वृत्तीच्या पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो तो समजा आपला इतिहास निर्माण करत नाही. राज्यातील लोकांना मला हे सांगायचे आहे की मंदिरावर जेव्हा जेव्हा आक्रमणं झाली. तेव्हा ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी म्हल्लारराव होळकरांनी तेथे मंदिर उभारले होते. आता शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार यांनी चौंडीत काहीतरी गोंधळ व्हावा दंगली व्हाव्या, असे षडयंत्र रचले आहे अशी टीका त्यांनी केली.

पवारांवर थेट हल्लाबोल

दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केलेला पैसा जयंतीला वापरता?

तसेच हे नवाब मलीकांच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांनी दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला. आणि तोच पैसा आहिल्यादेवींच्या जयंतीला वापरत आहेत. त्यामुळे आम्ही चौडींच्या ठिकाणी जर वाकडी नजर टाकत आसाला तर आम्ही ते सहण करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच रोहित पवार हे आता पत्रिका घेऊन फिरत होते. आजोबाला पत्रं देत फिरत आहेत. एका घरात राहाता आणि पत्रिका देण्याचे ढोंग करत आहेत, पण आरे काय तो तुझ्या लग्नाची कार्यक्रम आहे का? अशी घणाघाती टीका त्यांनी रोहित पवारांवर केली आहे.

मटण खाऊन देवाला जातात

तसेच रोहित पवार काण आहेत? कार्यक्रम घेणारे ते काय आहिल्यादेवींचे वंशज आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी असे राजकारण करू नये. ईकडे आहिल्यादेवींच्या नावाने प्रेम दाखवतात आणि तिकडे ते मटन खाऊन गणपतीला जातात, अशी घणाघाती टीका त्यांनी शरद पवारांच्या पुण्यात श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिरात न जण्यावर आणि नॉनव्हेजचे कारण सांगण्यावर केली आहे. त्यामुळे हा वादही अजून संपत नाही. तसेच मी पवारांना चारी बाजुने घेरले आहे. मागच्या निवडणुकीत जरी माझे डिपॉजिट जप्त झाले आसले तरी बारामतीकरांना काय मिळालं? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या काळात मी माझी ताकद पवारांना दाखवणार आहे. आता घोडा मैदान दूर नाही, असे म्हणत त्यांनी पवारांना पुन्हा आव्हान दिलं आहे.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर