AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, त्या दोन परीक्षांचे शुल्क परत मिळणार

sarkari naukri jobs 2023 : सरकारी नोकरीसाठी अनेक युवकांचा प्रयत्न सुरु असतो. परंतु ही नोकरी मिळवण्यासाठी अभ्यासाबरोबर अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. आता यापूर्वी निघालेल्या दोन जाहिरातीसंदर्भात असेच काही झाले होते...

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, त्या दोन परीक्षांचे शुल्क परत मिळणार
| Updated on: Sep 08, 2023 | 1:49 PM
Share

पुणे | 8 सप्टेंबर 2023 : राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेक युवकांचा प्रयत्न सुरु असतात. खासगी क्षेत्रापेक्षा या ठिकाणी असलेल्या सुरक्षिता आणि पगार हा त्यासाठी महत्वाचा विषय ठरतो. यामुळे अनेक युवक सरकारी नोकरीसाठी रात्रंदिवस अभ्यास करुन प्रयत्न करतात. परंतु कधी शासनाच्या सरकारी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. २०१९ मध्ये सुरु झालेल्या प्रक्रियेत असाच फटका विद्यार्थ्यांना बसला होता. त्यासाठी भरलेले शुल्क आता विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे.

कोणत्या होत्या परीक्षा

जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीसाठी २०१९ मध्ये प्रक्रिया सुरु झाली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते. त्यावेळी १३ हजार ५२१ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु झाली होती. त्यात १२ लाख ७२ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही भरती प्रक्रिया तीनवेळा पुढे ढकलली. त्यानंतर ती रद्द केली. या प्रक्रियेतून तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. अखेर ही प्रक्रिया रद्द झाल्यामुळे ते परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना संपर्क केला होता.

दुसऱ्या या परीक्षाचे काही रक्कम मिळणार परत

शासनाने म्हाडा भरतीसाठी प्रक्रिया केली होती. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये आणि जीएसटी १८० रुपये घेतले होते तर राखीव संवर्गातील उमेदवाराकडून ९०० रुपये आणि १६२ रुपये जीएसटी घेतले होते. या उमेदवारांना जीएसटी आणि अतिरिक्त शुल्क परत मिळणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आमदार रोहित पवार यांनी मानले आभार

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना संपर्क केला होता. अखेर गिरीश महाजन यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी आभार मानले आहे. परंतु जमा केलेल्या परीक्षा फी पैकी केवळ ६५% रक्कम परत करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. शासनाने सर्वच्या सर्व रक्कम परत केल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.