AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याकडून 8 लाखांची लाच घेणारा IAS अनिल रामोड याच्याबाबत सरकार मोठा निर्णय घेणार

CBI raids IAS Anil Ramod : पुणे येथे आयएएस अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड सध्या कारागृहात आहे. त्याने जामिनीसाठी अर्ज केला आहे. त्याचवेळी सरकारकडून त्याच्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार आहे.

शेतकऱ्याकडून 8 लाखांची लाच घेणारा IAS अनिल रामोड याच्याबाबत सरकार मोठा निर्णय घेणार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 16, 2023 | 10:30 AM
Share

पुणे : अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे सीबीआयने ९ जून रोजी छापा टाकला होता. या छाप्यात 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर अनिल रामोड याला पोलीस कोठडी दिली गेली. 13 जून रोजी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. रामोड सीबीआय कोठडीनंतर आता येरवडा कारागृहात आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून त्याच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तालयाने तयार केला आहे.

काय होणार कारवाई

पुणे विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला अनिल रामोड याच्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. लाचखोर अनिल रामोडला निलंबित करण्यात यावं, यासाठी विभागीय आयुक्तालयाचे थेट राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. लाचखोर आयएएस अधिकारी अन् विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या अनिल रामोड याला निलंबित करावे, विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे.

का केली मागणी

अनिल रामोड हा विभागीय सध्या कारागृहात आहे. परंतु जामीन मिळाल्यानंतर तो कार्यालयात रुजू होईल. त्यानंतर आयुक्तालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार करेल. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सीबीआयने विभागीय आयुक्तालयास पाठविलेल्या पत्राद्वारे केली होती. सीबीआयने विभागीय आयुक्तालयास निलंबनाबाबत पाठविलेल्या पत्रानुसार आयुक्तालयाने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना रामोड याचे निलंबन करण्यात यावे, असे पत्र पाठविले आहे.

सचिव कार्यालयाकडून प्रस्ताव तयार

सचिव कार्यालयाकडून निलंबनाच्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर निलंबित करण्यात येणार आहे. यामुळे आठ लाखांची लाच घेणाऱ्या अनिल रामोडवर लवकरच राज्य सरकारकडून निलंबनाची कारवाई होणार आहे.

का होते प्रकरण

शेतकऱ्याकडून भूसंपादनाच्या बदल्यात अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याने दहा लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर आठ लाखांची लाच देण्याचे ठरले. शेतकऱ्याने यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली गेली. त्यानंतर सीबीआयने टाकलेल्या छाप्यात 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रामोड याला अटक केली. डॉ. अनिल रामोड याचे लाच घेण्याचे एक सूत्र ठरले होते. भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच त्याच्याकडून घेतली जात होती. म्हणजेच भूसंपादनाचे मूल्य १ कोटी वाढवले तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील, असे त्याच्याकडून सांगितले जात होते. सीबीआयने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...