“14 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही”, गोविंददेव गिरी महाराजांची राहुल गांधींवर टीका

पुण्यात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या अयोध्या या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. गोविंदगिरी महाराज आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं (Govinddev Giri Maharaj slams Rahul Gandhi)

14 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही, गोविंददेव गिरी महाराजांची राहुल गांधींवर टीका
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 7:27 PM

पुणे : “14 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही”, अशा शब्दात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. पुण्यात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. गोविंदगिरी महाराज आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी काँग्रेसला टोला लगावला (Govinddev Giri Maharaj slams Rahul Gandhi).

“अयोध्या हे शिकण्याचं केंद्र आहे. मंदिराला दिव्यत्वाची सीमा नसणार आहे. राम मंदिराचा संघर्ष हा रोमांचक आहे. संन्याशांनी, नागा साधू आणि तीन लाख लोकांनी बलिदान दिलं आहे. राम हा देशाचा कस आणि बळ आहे. जोपर्यंत रामाचं चिंतन आहे, तोपर्यंत हा देश बलवान आहे”, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले (Govinddev Giri Maharaj slams Rahul Gandhi).

“छपत्रतींच्या प्रतिमेचा काहींनी मेकअप केलाय. तर काहींची मुळ प्रेरणा आहे. राजनीतीचं हिंदूकरण आणि हिंदूचं सैनिकीकरणाची प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

आक्रमकांनी दोन गोष्टी पाहत आक्रमण केलं : चंद्रकांत पाटील

“6 डिसेंबर 1992 नंतर बाबरी मस्जिद पाडल्यावर इतर ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळाले. नंतर जम्मू काश्मीर आणि देशात विविध ठिकाणी मंदिर पाडली गेली. रामजन्मभूमी ही मंदिर नाही तर स्वाभिमानावर झालेला आघात आहे. आक्रमकांनी दोन गोष्टी पाहत आक्रमण केलं एक म्हणजे मंदिर आणि दूसरी स्त्री. कारण आपल्या समाजात या दोन गोष्टींवर खूप श्नद्धा आहे. त्यांनी हिंदू समाज मोडून काढण्याचं काम केलं. आम्ही त्याला प्रत्युत्तर देत आहोत”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

“अनेक जण टीका करतील. त्यांना पुन्हा एकदा त्यांना आधीचं राज्य आणायचंय. मात्र मंदिर हे नवनिर्माणाचं केंद्र आहे. आमच्या अस्मितेवरचा घाला घातला गेला. त्याला आम्ही मंदिर उभारून प्रत्युत्तर देणार आहोत. एक लाख रुपयांचा निधी देणाऱ्यांना अयोध्या हे पुस्तक मोफत भेट दिलं जाईल”, असंदेखील पाटील यावेळी म्हणाले.

“गेली चाळीस-पन्नास वर्षे रामजन्मभूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. रामजन्मभूमी, रामजन्मभूमी आंदोलन, संघटना यांना बदनाम केलं. खरंतर ही एक वैचारिक लढाई आहे”, असं मत माधव भंडारी यांनी यावेळी मांडलं.

हेही वाचा : लढ्याला यश! भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.