AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Chavan: ‘मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाईल, लॅपटॉपचं माहिती नाही’

धनराज घोगरे यांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. | dhanraj ghogare pooja chavan

Pooja Chavan: 'मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाईल, लॅपटॉपचं माहिती नाही'
पूजा चव्हाण इमारतीवरून खाली पडली तेव्हा मी त्याठिकाणी केवळ माणुसकीच्या नात्याने गेलो होतो. मी तिला उचलून रिक्षात ठेवले.
| Updated on: Mar 04, 2021 | 3:46 PM
Share

पुणे: पूजा चव्हाण इमारतीवरुन खाली पडली होती तेव्हा मी फक्त उचलून तिला रिक्षात ठेवलं. तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपशी माझा काहीही संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती भाजप नगरसेवक धनराज घोगरे (Dhanraj Ghogare) यांनी दिली. (BJP corporator Dhanraj Ghogare not reachable after accussations of stealing pooja chavan laptop)

धनराज घोगरे यांच्यावर पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर धनराज घोगरे गायब असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर धनराज घोगरे यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.

पूजा चव्हाण इमारतीवरून खाली पडली तेव्हा मी त्याठिकाणी केवळ माणुसकीच्या नात्याने गेलो होतो. मी तिला उचलून रिक्षात ठेवले. त्यावेळी अरूण राठोड आणि विलास चव्हाण हे दोघेही त्याठिकाणी हजर होते. पूजाला उपचार मिळणे, ही माझी प्राथमिकता होती. मी पूजाच्या फ्लॅटमध्ये जाऊन तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही, असे धनराज घोगरे यांनी सांगितले.

‘या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न’

पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर पूजाच्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. पोलीस पंचनाम्यात त्याची नोंदही आहे. पोलिसांनी अनेक लोकांचा जबाबही नोंदवून घेतला. आता काहीजण याप्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. पूजाच्या लॅपटॉपमधील व्हीडिओ मीच व्हायरल केले, हे आरोप खोटे आहेत. तसेच मी कुठेही गायब नव्हतो. मी पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या कामात व्यग्र होतो. माझ्यावर आरोप होत असल्याचे कळाल्यानंतर मी ही पत्रकारपरिषद घेतल्याचे धनराज घोगरे यांनी सांगितले.

धनराज घोगरे कोण आहेत?

धनराज घोगरे हे पुणे महापालिकेतील नगरसेवक वानवडी वॉर्डमधून भाजपच्या तिकीटावर नगरसेवक पुणे महापालिकेतील शहर विकास समितीचे उपाध्यक्ष पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणी दाखल गुन्ह्यात नाव

पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काय आहे?

या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांनी पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप का ताब्यात घेतला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. या लॅपटॉपमध्ये संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता आहे. पोलीस तपास सुरु असताना दुसरीकडे दररोज पूजा चव्हाण प्रकरणातील नवे व्हीडिओ, फोटो आणि माहिती समोर येत आहे. ही माहिती नेमकी कुठून बाहेर पडत आहे, याचा तपास अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे आता संशयाची सुई धनराज घोगरे यांच्याकडे वळली आहे.

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE | पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती

VIDEO: शांताबाई खरंच पूजा चव्हाणची आजी आहे का? पूजाच्या आत्महत्येनंतर आता नात्यातील फ्रॉड?

पूजा चव्हाणचा लॅपटॉप पुण्यातील भाजप नगरसेवकाने चोरला?

(BJP corporator Dhanraj Ghogare not reachable after accussations of stealing pooja chavan laptop)

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.