Air transport affected in pune | पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येचा हवाई वाहतुकीवर परिणाम ; या कारणामुळं कंपन्या करतायत विमाने रद्द

Air transport affected in pune | पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येचा हवाई वाहतुकीवर परिणाम ; या कारणामुळं कंपन्या करतायत विमाने रद्द

दरवर्षी हिवाळ्याच्या हंगामात मोठ्याप्रमाणात प्रवासी पर्यटनासाठी जात. मात्र कोरोनाचा विषाणू आल्यापासून हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  काही दिवसांपूर्वी शहरातील विमानतळावरून रोजचे 70 - 75  विमानांचे उड्डाण होत होते. मात्र यामध्ये आता घेता झाली आहे. सद्यस्थितीला शहरात केवळ 40ते 45 विमानाचे उड्डाण होत आहे. या रद्द होणाऱ्या विमानामध्ये दिल्ली व जयपूरला जाणाऱ्या विमानाचा समावेश अधिक आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 18, 2022 | 2:32 PM

पुणे – राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या(corona) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येचा परिणामी हवाई वाहतुकीवर झाला आहे. पुणे विमानतळावरून होता असलेल्या विमानाच्या उड्डाणात 20 ते 25 विमाने रद्द होत आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे अनेक नागरिकांनी प्रवासासाठी बुक केल्ली तिकिटे रद्द (cancel) करत आहेत. साहजिकच याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे समोर आले आहे.

हवाई वाहतुकीला फटका

दरवर्षी हिवाळ्याच्या हंगामात मोठ्याप्रमाणात प्रवासी पर्यटनासाठी जात. मात्र कोरोनाचा विषाणू आल्यापासून हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  काही दिवसांपूर्वी शहरातील विमानतळावरून रोजचे 70 – 75  विमानांचे उड्डाण होत होते. मात्र यामध्ये आता घेता झाली आहे. सद्यस्थितीला शहरात केवळ 40ते 45 विमानाचे उड्डाण होत आहे. या रद्द होणाऱ्या विमानामध्ये दिल्ली व जयपूरला जाणाऱ्या विमानाचा समावेश अधिक आहे.

बुकिंग न झाल्याने   विमान रद्द

प्रवाश्यांची संख्या कमी झाल्याने अनेक प्रवासी कंपन्याही विमाने रद्द करत आहेत. काही विमानाचे अवघे 5 ते 7  इतकेच बुकिंग न झाल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या ते विमान रद्द करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे विमानतळाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही जवळपास 17 ते 18 हजार झाली होती. ती आता 11 ते 13 हजार इतकी झाली आहे.”कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं काही दिवसांपासून प्रवासी संख्या कमी होत असल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या आपले उड्डाण रद्द करीत आहेत, अशी पुणे विमानतळाचे संचालक संतोष डोके यांनी सांगितले.”

कृषी विभागाची भूमिका बजावत आहे ‘शिवार’ फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम

Dhanush aishwarya Divorce : अभिनेता धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर चाहत्यांमध्ये नाराजी तर राम गोपाल वर्मा म्हणतात,’घटस्फोटाचा उत्सव साजरा करा!’

औरंगाबादमधून बजाजच्या तीन चाकी वाहन निर्मितीचा श्रीगणेशा, वाळूज एमआयडीसी परिसरात ई-वाहनांची निर्मिती

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें