AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमधून बजाजच्या तीन चाकी वाहन निर्मितीचा श्रीगणेशा, वाळूज एमआयडीसी परिसरात ई-वाहनांची निर्मिती

ईलेक्ट्रीक वाहन निर्मितीत अनेक कंपन्यांनी नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. यात तीनचाकी वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीची कंपनी बजाज ऑटो ही मागे नाही. बजाज औरंगाबादेत तीनचाकी इलेक्ट्रीक वाहनांचा प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे

औरंगाबादमधून बजाजच्या तीन चाकी वाहन निर्मितीचा श्रीगणेशा, वाळूज एमआयडीसी परिसरात ई-वाहनांची निर्मिती
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 1:53 PM
Share

बजाज ऑटो इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात दमदार मुसंडी मारण्याच्या बेतात आहे. कंपनीने ई-वाहन (E Vehical) निर्मितीत भरीव गुंतवणुकीची घोषणा केली आहे. बजाज पुण्यातील आकुर्डी नंतर औरंगाबाद मध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीत तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन उभारण्याचा  विचार करत आहे.कंपनीने पुण्याजवळील आकुर्डी येथे उत्पादन प्लॅट उभारणीला सुरुवात केली आहे. या ठिकाणाहून दरवर्षी 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यात येणार आहे. तर 800 जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. बजाज ऑटोने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांकडे लक्ष केंद्रित केले आहे.एकूण बाजारपेठेतील मागणी व गरज तसेच लोकांची रक्कम मोजण्याची क्षमता हे लक्षात घेऊन बजाज व्यवस्थापनाने औरंगाबादेत तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा नवा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग  म्हणून औरंगाबादमध्ये  नव्या प्रकल्पासाठी कंपनीने चाचपणी सुरू केली आहे.

तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन उत्पादनातील हब म्हणून औरंगाबाद शहराकडे बघितले जाते. याठिकाणी बजाज पुढचा टप्पा म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी  प्रयत्न सुरू झाले आहेत. बजाजने यापूर्वी पुण्यातील आकुर्डी येथे ईव्ही-२ या चेतक स्कूटरच्या उत्पादनाची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.  काही वर्षांपूर्वी  बाजारपेठेत उतरविलेल्या क्युट या मॉडेलचे बजाज इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करण्याचा विचार करत आहे.

औद्योगिक वसाहत फुलणार

१९८० च्या दशकात औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत बजाज उद्योग समूहाचे आगमन झाले. या प्रकल्पात प्रामुख्याने दुचाकी आणि रिक्षांचे उत्पादन सुरू झाले. बजाजला सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या अनेक छोटया कंपन्या स्थापन झाल्या. त्यामुळे औद्योगिक जगताचे चित्रच बदलून गेले. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. नव्या प्रकल्पामुळे पुन्हा प्रगतीचे वारे वाहिल आणि औद्योगिक वसाहत पुन्हा फुलेल.

बाजारपेठेतील मागणी, कल पाहून निर्णय

तीनचाकी वाहनांमध्ये बजाजची मक्तेदारी असली तरी गेल्या दोन वर्षांत महिंद्रा अँड महिंद्रा, पियाजो कंपनीने या क्षेत्रात धडक मारली आहे. लोहिया ऑटो, कायनेटिक ग्रीन, अतुल ऑटोही प्रगती करत आहेत. टीव्हीएस कंपनीही याच दिशेने वाटचाल करत आहे. एकूण बाजारपेठेतील मागणी व गरज तसेच लोकांची रक्कम मोजण्याची क्षमता हे लक्षात घेऊन बजाज व्यवस्थापनाने औरंगाबादेत तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा नवा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सर्व काम ऑटोमॅटिक

आकुर्डी येथील  इलेक्ट्रिक वाहन उत्पादन विभागाचे काम स्वयंचलित चालणार आहे. अत्याधुनिक रोबोट आणि ऑटोमॅटिक प्रणालीवर हे काम चालेल. लॉजिस्टिक्स आणि मटेरियल हँडलिंग, फॅब्रिकेशन, पेटिंग, असेंबलिंग ही सर्व कामे ऑटोमॅटिक होणार आहे. हा प्लँट 5 हजार चौरस फुटावर कार्यान्वित होईल. या प्लँटमध्ये जवळपास 800 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. जून 2022 पर्यंत नवीन वाहन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

आकुर्डी प्लँट

आकुर्डी हा कंपनीचा पहिल्यांदा वाहन उत्पादनाचा सर्वात जूना प्लँट आहे. हा प्लँट तब्बल 160 एकरवर उभा असून सध्या बजाज ऑटो संशोधन आणि विकास ( research and development (R&D) उपक्रम या ठिकाणी सुरु आहे. तसेच खरेदी आणि विक्री विभागही कार्यरत आहे.

स्वेच्छा निवृत्ती वेतन योजना (voluntary retirement scheme) राबविण्यापूर्वी क्रिस्टल या स्कुटरचे आकुर्डीत उत्पादन होत होते. मात्र शटडाऊनमुळे हा प्लँट प्रभावित झाला होता. बजाज ऑटो सध्या चेतक या लोकप्रिय ब्रँडचे इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये उतरविण्याच्या तयारीत आहे. Husqvarna brand च्या अंतर्गत कंपनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुरु करणार आहे. त्यानंतर स्वतःचा ब्रँड बाजारात उतरविणार आहे. 2022 मध्ये कंपनी तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरविणार आहे. त्यासाठी निर्धारीत वेळेपेक्षा अधिकचा उशीर झाला आहे. जुलै 2021 मध्ये बजाज ऑटोने इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन उत्पादनाचा निर्णय घेतला. त्यात दुचाकी, तिनचाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश आहे.

 इतर बातम्या-

Video : अमरावतीहून पोरं निघालेत, शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटलेली; नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा, अनिल बोंडेंचा इशारा

Shattila Ekadashi 2022 Date | जाणून घ्या, षटिला एकादशी म्हणजे नक्की काय ? मुहूर्त आणि व्रताची पद्धत

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.