AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात एप्रिल अंगाची लाहीलाही करणार; काही भागात पावसाची शक्यता – हवमान विभागाने वर्तवला अंदाज

येत्या काही दिवसात शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पार करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्रात एप्रिल अंगाची लाहीलाही करणार;  काही भागात पावसाची शक्यता - हवमान विभागाने वर्तवला अंदाज
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 03, 2022 | 3:15 PM
Share

पुणे – महाराष्ट्रात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे दिसून येते आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजनुसार राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातील तीव्र उन्हाळ्यानंतर आता एप्रिलही अंगाची लाहीलाही करणार असा अंदाज व्यक्त आहे. पुण्यात दिवसाचे तापमान 39.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मात्र एप्रिल दोन दिवसात महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात उष्णतेची लाट (Heat wave)निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात शहरातील तापमान 40  अंश सेल्सिअस पार करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यातील पुण्यात  किमाल तापमान  39.7 अंश सेल्सिअस आहे तर सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 43.5  अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विदर्भात निर्माण झालेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला, चंद्रपूर, या परिसरात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या कमाल तापमानाने 40 अंशाचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात येत्या 6 व 7  एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

प्रमुख शहरातील तापमान

पुणे  – 39.7

परभणी- 42.2

अकोला 43.5

अमरावती42

बुलडाणा 40.2

चंद्रपूर 43.4

गोंदिया 41

नागपूर 41.1

वाशिम 42

वर्धा 42.4

नांदेड -41. 8

उस्मानाबाद 40.9

परभणी 42.2

नाशिक 38.7

सांगली 40.2

सातारा 39.5

सोलापूर 42.8

मुंबई 32.7

रत्नागिरी 31.6

पणजी 33.3

औरंगाबाद40.2

Paytm कॅशबॅक पॉईंट्स ऑफर लाँच, 6 लाखांच्या कारसह Iphone 13 जिंकण्याची संधी

Pakistan National Assembly dissolved: अखेर पाकिस्तानची संसद बरखास्त, 90 दिवसाच्या आत निवडणुका घ्यावा लागणार

Galapagos tortoise : ‘अभी तो मैं जवान हूँ’; 70व्या वर्षी बाप बनलेल्या ‘या’ कासवाची भलतीच रंगलीय चर्च

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा