AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी मुलाला शाळेत पाठवलं, दुपारी मृतदेह घरी आला, पुण्यातून धक्कादायक बातमी

Pune News : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा मृत्यु झाला आहे. शाळेत नेमकं असं काय घडलं की चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.

सकाळी मुलाला शाळेत पाठवलं, दुपारी मृतदेह घरी आला, पुण्यातून धक्कादायक बातमी
| Updated on: Feb 16, 2024 | 4:39 PM
Share

पिंपरी चिंचवड : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचा खेळत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्याला रूग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता.

नेमकं काय घडलं?

काळेवाडीत राहणारा सार्थक हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता. बाराच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. पण रेलिंगवर घसरगुंडी खेळणं धोकादायक होतं. याची कल्पना असल्यानं एका मित्राने तू इथं खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेक. असं म्हणत रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने तो ऐकला नाही.

सार्थक त्याच्याच धुंदीत होता त्याने काही ऐकलं नाही. अचानकपणे त्याचा तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी पोलिसांनी दिली. या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला, तातडीनं त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

दरम्यान, सार्थकसह इतर मुलं बाहेर असताना शाळेतील शिक्षक कुठे होते?  विद्यार्थी बाहेर असताना रेलिंगची जागी धोकादायक आहे याची शाळा व्यवस्थापनाला माहिती नव्हती का? असा सवाल उपस्थित होत आहे. शाळा व्यवस्थापनावर काही पालक टीका करू लागले आहेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.