अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांच्या शंखांचा निनाद

ayodhya ram mandir pran pratishtha : पुणे शहरात एक मोठे अभियान सुरु झाले आहे. या अभियानात लाखो लोक सहभाग घेतला होता. आता पुणे येथील शंखनाद टीमला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंख वाजवण्यासाठी आमंत्रण दिले आहे. केशव शंखनाद टीमच्या सदस्यांना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र समितीचे महासचिव चंपत राय यांनी आमंत्रण दिले आहे.

अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांच्या शंखांचा निनाद
पुणे केशव शंखनाद टीम
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 3:48 PM

पुणे दि.25 डिसेंबर | अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येत यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. निमंत्रणे पाठवली जात आहेत. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पुणेकरांनी बनवलेले वस्त्र वापरण्यात येणार आहे. त्यासाठी 13 दिवस हे अभियान राबवण्यात आले. त्यात दहा लाख लोकांनी सहभाग घेतला. ‘दो धागे श्री राम के लिए’ या अभियानात लोकांना अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामचे वस्त्र तयार केले. त्यानंतर पुणेकरांचा आणखी सन्मान झाला आहे. पुणे शहरातील मंडळी अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंख नांद करणार आहे. त्यासाठी केशव शंखनाद टीमच्या 111 जणांना आमंत्रण दिले गेले आहे.

पुण्यातील शंखनाद टीमला आमंत्रण

पुणे येथील शंखनाद टीमला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंख वाजवण्यासाठी आमंत्रण दिले आहे. केशव शंखनाद टीमच्या सदस्यांना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र समितीचे महासचिव चंपत राय यांनी आमंत्रण दिले आहे. टीमचे अध्यक्ष नितिन महाजन यांना यासंदर्भात पत्र मिळाले आहे. मंदिराचा प्राण प्रतिष्ठा समारंभ 18 जानेवारी रोजी सुरु होणार आहे. त्यानंतर 22 जानेवारी रोजी मंदिरात भव्य समारंभ होणार आहे. यासाठी पुणे शहरातील केशव शंखनाद टीमचे 111 जण जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

18 जानेवारी रोजी सदस्य जाणार

नितिन महाजन यांनी सांगितले की, पुणे येथील मंदिरांमध्ये ‘शंखनाद’ अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. केशव शंखनाद टीममध्ये 500 जण संगीतमय शंखाचा निनाद करतात. त्यात 90 टक्के महिला आहेत. अगदी 5 वर्ष वयापासून ते 85 वर्ष वयापर्यंतचे सदस्य टीममध्ये आहे. यासाठी टीमचे 111 सदस्य 18 जानेवारी रोजी अयोध्यात पोहचणार आहे. पुणे शहरात सुरु असलेल्या ‘दो धागे श्री राम के लिए’ अभियानानंतर शंखनाद करण्याची संधी पुणेकरांना मिळाली. पुण्यात ‘दो धागे श्री राम के लिए’ यासाठी 10 लाख लोकांची सहभाग घेतला होता, असे अभियानाचे आयोजक अनघा घैसास यांनी सांगितले.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....