Pune Job Fraud | सहा लाखांत नोकरी, कशा पद्धतीने अनेकांची केली फसवणूक

Pune Job Fraud | राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण कसोसीने प्रयत्न करतात. परंतु काही जण पैसे देऊन नोकरी मिळवण्यास तयार होता. याच संधीचा फायदा घेते एकाने अनेकांना लुबाडले.

Pune Job Fraud | सहा लाखांत नोकरी, कशा पद्धतीने अनेकांची केली फसवणूक
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 8:34 AM

पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : सरकारी नोकरी तरुणांचे आकर्षण असते. या नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात. काही जण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यात यश मिळवतात. परंतु काही जण शार्ट मार्गाच्या फेऱ्यात अडकतात. भारतीय लष्कारात दाखल होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. हे स्वप्न पाहणाऱ्या 42 युवकांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक तब्बल एक कोटी 80 लाखांमध्ये झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपीवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सदर्न कमांडचा लायझन युनिटने हा प्रकार उघडकीस आणला.

कशी केली युवकांची फसवणूक

सांगली जिल्ह्यातील तासगावमधील पांडुरंग कराळे याने अनेकांची फसवणूक केली. हा प्रकार त्याने फेब्रवारी 2022 ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत केला. महेश ढाके हे फेब्रवारी महिन्यात कामासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी कोंढवा येथे त्यांची पांडुरंग कराळे याच्याशी भेट झाली. पांडुरंग कराळे याने आपली लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगितले. मग ढाके यांनी तुम्ही आर्मीसाठी भरती करतात का? असे विचारले. त्यावेळी त्याने आपण अधिकाऱ्यांना सांगून अशी अनेकांची कामे केल्याचे सांगितले.

असा सुरु केला फसवण्याचा प्रकार

दोन दिवसांनी महेश ढाके यांना कराळे यांचा फोन आला. टिरिटोरिअल आर्मीत भरती होणार आहे. कोण असेल तर सांगा? तसेच एका उमेदवारासाठी सहा लाख लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ढाके यांनी मित्रांना आणि नातेवाईकांना हा विषय सांगितला. एक, एक करत 42 उमेदवार ढाके यांनी कराळे यांना दिले. त्यांच्याकडून एक कोटी 80 लाख रुपये त्यांनी घेतले.

हे सुद्धा वाचा

बनावट हॉल तिकीट, अन् परीक्षेचा…

ढाके यांनी कराळे यांनी सांगितल्यानुसार बेळगाव येथे मुलांना नेले. त्याठिकाणी त्या मुलांची कागदपत्रे तपासली गेली. फिटनेस चाचणीही करण्यात आली. लेखी परीक्षेसाठी हॉल तिकीट दिले. परंतु परीक्षांची तारीख वारंवार बदलत गेली. मग ढाके यांनी परीक्षेची तारीख नक्की सांगा नाही तर पैसे परत द्या, असे सुनावले. परंतु या गोष्टी झाल्या नाही. यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली. त्याच्या फिर्यादीनंतर सदर्न कमांडने एक डमी उमेदवार पाठवून हा प्रकार उघड केला. या प्रकरणा पांडुरंग कराळे याला अटक करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.