स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, CISF च्या जवानांकडून पुणे ते दिल्ली सायकल रॅली, जुन्नरवासियांकडून जल्लोषात स्वागत

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र वर राज्य सरकारकडून साजरा करण्यात येत आहे. देशभर वर्षभरात विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे. केंद्रीय औद्योगिक पोलीस दलाच्या वतीनं देखील विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, CISF च्या जवानांकडून पुणे ते दिल्ली सायकल रॅली, जुन्नरवासियांकडून जल्लोषात स्वागत
सीआयएसएफ जवानांचं स्वागत

जयंत शिरतर टीव्ही 9 मराठी, जुन्नर, पुणे: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र वर राज्य सरकारकडून साजरा करण्यात येत आहे. देशभर वर्षभरात विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे. केंद्रीय औद्योगिक पोलीस दलाच्या वतीनं देखील विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत पुणे ते दिल्ली महात्मा गांधी समाधी राजघाट इथपर्यंत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 सप्टेंबरपासून पुण्यातून ही सायकल प्रवास सुरु करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे सीआयएसएफच्या जवानांचं स्वागत करण्यात आलं आहे.

पुणे ते दिल्ली महात्मा राजघाट सायकल प्रवास

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत.त्यामुळे संपूर्ण देशात अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे. याच धर्तीवर पुणे येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने दिल्ली येथे “आजादी का अमृतमहोत्सव” साजरा करण्यासाठी या सेवेमधील 12 जवानांनी “पुणे ते दिल्ली महात्मा राजघाट “असा सायकलचा प्रवास सुरू केला आहे.यामधे औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी सहभाग घेतला होता.

दिल्लीत 2 ऑक्टोबरला पोहोचणार

1703 कि.मी.चा प्रवास हे सायकल स्वार 2 आक्टोबर पर्यंत पूर्ण करणार आहेत. तसेच या प्रवासामधील मुक्काम असणा-या शहरांमध्ये स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवाचं महत्त्व आणि देशसेवा याबद्दलचे महत्त्व पटवून देणार आहेत. यावेळी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील नागरिकांनी जवानांचे जंगी स्वागत करून परीसरात भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.

नागरिकांकडून शुभेच्छा

जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे यानी या जवानांचे स्वागत करून त्याना पेढे भरवून या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.तसेच सर्वसामान्य नागरीकांमधे देशभक्ती रुजवण्यात तुम्ही मोहीम हाती घेतली आहे त्याबद्दल सीआयएसएफच्या जवानांचं आभार मानतो, असं ते म्हणाले.

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त खादी इंडियाकडून प्रश्नमंजुषा

31ऑगस्ट 2021 ते 14 सप्टेंबर 2021 असे पंधरा दिवस ही प्रश्न मंजुषा सुरु राहणार असून केव्हीआयसीच्या सर्व डिजिटल मंचावरून दररोज 5 प्रश्न मांडण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://www.kviconline.gov.in/kvicquiz/ ला भेट द्या. सहभागी व्यक्तींनी 100 सेकंदात सर्व पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. दररोज सकाळी 11 वाजता प्रश्नमंजुषा सुरु होणार असून पुढचे 12 तास म्हणजेच रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रश्न पाहता येणार आहेत. भारताचा स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य सैनिकांचे समर्पण आणि त्याग तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून खादीची परंपरा यांच्याशी जन सामान्यांची नाळ जोडण्याचा यामागचा उद्देश आहे. भारताचा स्वातंत्र्य लढा, स्वदेशी चळवळीतली खादीची भूमिका आणि भारतीय राजकीय पटलासंदर्भातल्या प्रश्नांचा या प्रश्न मंजुषेत समावेश आहे.

दररोज 21 विजेत्यांची घोषणा
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणाऱ्या सहभागीला त्या दिवसाचा विजेता म्हणून जाहीर केले जाईल. दर दिवशी 21 विजेत्यांची (प्रथम पारितोषिक, 10 द्वितीय पारितोषिके आणि तिसऱ्या क्रमांकाची दहा पारितोषिके) नावे जाहीर करण्यात येतील. दर दिवशी विजेत्यांना खादी इंडियाची एकूण 80,000 रुपये मूल्याची ई-कुपन्स दिली जातील. केव्हीआयसीच्या www.khadiindia.gov.in. या ऑनलाईन पोर्टलवर त्याचा वापर करता येईल.

इतर बातम्या:

संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश, पैठणचे रुपडे पालटणार

BAMU: विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शुल्ककपात, जाणून घ्या सविस्तर

कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, औरंगाबाद विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारणार

Junnar people welcomes Cycle rally of CISF Jawan on Aazadi ka Amrit Mahotsav

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI