AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agrawal Case: मोठी अपडेट! सिया आणि चेतनची होणार सुटका? पोलिसांची धडपड सुरु, प्लान B रेडी

Ketan Agrawal Case: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Ketan Agrawal Case: मोठी अपडेट! सिया आणि चेतनची होणार सुटका? पोलिसांची धडपड सुरु, प्लान B रेडी
Ketan Agraval caseImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 01, 2026 | 3:38 PM
Share

पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरुन ढकलून हत्या करण्यात आली. आता या मृत्यूप्रकरणाचा तपास अत्यंत गुंतागुंतीच्या टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचा कसून तपास सुरू केला असून, भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी धडपड सुरू आहे. एका चुकीमुळे आरोपी सुटू नये, यासाठी पोलिस पूर्ण अलर्ट मोडवर काम करत आहेत.

तपासातील मोठे आव्हान

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी मेघालयात घडलेल्या ‘सोनम रघुवंशी हनीमून मर्डर’ प्रकरणात पोलिसांच्या तांत्रिक आणि कायदेशीर चुकांमुळे आरोपीला जामीन मिळाला होता. त्याच चुका येथे होऊ नयेत, म्हणून महाराष्ट्र पोलिस अत्यंत दक्षतेने पावले टाकत आहेत.

पॉलीग्राफ टेस्टची तयारी

विश्वसनीय सूत्रांनुसार, मुख्य आरोपी सिया गोयलची पॉलीग्राफ टेस्ट (लाइ डिटेक्टर टेस्ट) घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. भारतीय कायद्यानुसार या चाचणीचा अहवाल न्यायालयात थेट पुरावा मानला जात नाही, तरीही तपासाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता लक्षात घेता ही चाचणी घेतली जाणार आहे. पोलिसांना आशा आहे की, या चाचणीदरम्यान सियाने लोहगडच्या दरीबद्दल किंवा इतर संशयास्पद गोष्टींबाबत नकळत माहिती दिली तर, संबंधित डिजिटल डेटा (ब्राउझर हिस्ट्री, लोकेशन, डिलीटेड मेसेज) अधिकृतपणे काढता येईल. हा डेटा न्यायालयात मजबूत पुरावा ठरू शकतो.

फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांवरच केस

सद्यस्थितीत संपूर्ण केस केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर (Circumstantial Evidence) अवलंबून आहे. घटनास्थळी कोणीही प्रत्यक्ष पाहिले नाही. सीसीटीव्हीमध्ये चेतन चौधरी हुडी घालून फिरताना दिसतो, मात्र त्यावरून थेट हत्येचा आरोप सिद्ध होत नाही. पोलिसांनी डमी वापरून गुन्ह्याची पुनर्रचना केली असली तरी, डमी आणि खऱ्या व्यक्तीच्या पडण्यात फरक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

सोनम रघुवंशी प्रकरणाचे धडे

सोनम रघुवंशी प्रकरणात पोलिसांनी अटकेचे कारण योग्यरित्या नमूद न केल्याने आणि कायद्याच्या कलमांमध्ये चूक केल्याने आरोपीला जामीन मिळाला. “न्यायालय पुराव्यांवर चालते, मीडिया ट्रायलवर नाही. एक छोटी चूकही संपूर्ण केस कमकुवत करू शकते,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

डिजिटल पुराव्यांकडे लक्ष

सिया गोयलला केतनशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे तिने प्रियकर चेतनसोबत मिळून केतनला कट रचून संपवल्याचा पोलिसांचा संशय आहे. या पूर्वनियोजित कटाची साखळी पूर्ण करण्यासाठी मोबाइल डेटा, सर्च हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा मुख्य भर आहे.

Follow Us
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!