AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune suicide : सुप्रसिद्ध गायिकेच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं…

आत्महत्येची ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, घरातील परिस्थिती चांगली असताना, सधन कुटुंबाची पार्श्वभूमी असताना अशाप्रकारचे टोकाचे पाऊल उचलल्याने दु:खासह आश्चर्यही व्यक्त होत आहे.

Pune suicide : सुप्रसिद्ध गायिकेच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं...
अक्षय माटेगावकरImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 11:22 PM
Share

पुणे : सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिच्या चुलत भावाने पुण्यात आत्महत्या केली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत त्याने आपले आयुष्य संपवले आहे. अक्षय अमोल माटेगावकर (Akshay Mategaonkar) असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे. अक्षय संगणक अभियंता होता. नोकरी न लागण्याच्या भीतीने आणि अपेक्षांच्या ओझ्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचचले आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (Suicide note) याचा उल्लेख त्याने केला आहे. सर्वांची माफी मागतो. मला माफ करा. हे माझे कदाचित शेवटचे बोलणे आहे, असे चिठ्ठीत त्याने लिहिले आहे. मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे, असा उल्लेख केला आहे. सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिचा तो चुलत भाऊ होता. अक्षयचे कुटुंब सुसगावमध्ये राहते.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय?

माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वांची मी माफी मागतो. तुमच्या कोणाच्याच अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल मला माफ करा. मी खूप प्रयत्न केला, मेहनत घेतली. मात्र त्यात मला अपयश आले. इंटर्नशीप चांगली व्हावी, यासाठी मी खूप मेहनत घेतली, मात्र ती खराब झाली. त्यामुळे मला प्लेसमेंट नाही मिळाली. हे सर्व तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. आई, बाबा आणि आकांक्षा, आय अॅम सॉरी… आय क्विट, लिहित त्याने आत्महत्या केली.

akshay mategaonkar suicide note

आत्महत्येपूर्वी अक्षयनं लिहिलेली चिठ्ठी

कुटुंब उच्चशिक्षित आणि सधन

अक्षयचे वडील अमोल माटेगावकर हे प्रिन्स्टन ब्लूमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. याचठिकाणी ते इंडिया हेडदेखील आहेत. आई मीनल माटेगावकर या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या हेड आहेत. तर बहीण आकांक्षा माटेगावकर एमआयटी कॉलेजमध्ये डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. उच्चशिक्षित आणि सधन कुटुंब असताना अक्षयने आत्महत्या केल्याने हळहळ आणि आश्चर्यही व्यक्त होत आहे. अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्याचे शिक्षण सुरू होते.

पहाटेच्या सुमारास घडली घटना

आत्महत्येची ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, घरातील परिस्थिती चांगली असताना, सधन कुटुंबाची पार्श्वभूमी असताना अशाप्रकारचे टोकाचे पाऊल उचलल्याने दु:खासह आश्चर्यही व्यक्त होत आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...