पुणे : कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका लक्षात घेता येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंधाची स्थिती जैसे थेच असणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती. मात्र पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः याबाबत माहिती दिली (Know new restriction in Pune amid Corona lockdown by Dilip Walse Patil).