Bulk cart race| कोरेगाव-भीमा शौर्य दिनाला परवानगी मग बैलगाडा शर्यतीला का नाही? – शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील आक्रमक

जर मागील तीन दिवसांपासून पोलीस प्रशासन इथे येऊन पाहणी करतेय. सर्व तयारी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने आम्ही संपर्कात होतो. मात्र तरीही आम्हाला माहिती न देता रात्री शर्यतीला स्थगिती दिली जातेय.

Bulk cart race| कोरेगाव-भीमा शौर्य दिनाला परवानगी मग बैलगाडा शर्यतीला का नाही? - शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील आक्रमक
बैलगाडा शर्यत
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 6:06 PM

पुणे- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आंबेगाव येथे होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. बैलगाडा शर्यतीला स्थगिती देण्यामागे राजकारण झाले आहे. कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असल्यामुळे शर्यतीला स्थगिती देण्यात आली आहे. बैल गाडा रद्द केल्या या संदर्भात मी मुख्यमंत्र्याशी बोलणारा आहे. एकीकडे भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते. मग शर्यतीला का नाही? असा सवाल शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रशासनाला केला आहे.

घाटात ठिय्या आंदोलन अचानकपणे बैलगाडा शर्यत रद्द केल्याने , बैलगाडा प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णया विरोधात घाटात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनात शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव पाटीलही आंदोलनास बसले आहेत. आंदोलनातून जिल्हाप्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी आम्हाला विश्वासात न घेता बैलगाडा शर्यतीच्या स्थगितीची नोटीस काढली याचा आम्ही निषेध करत आहोत.

माहिती न देता रात्री शर्यतीला स्थगिती बैलगाडा स्थगितीची माहिती आम्हाला काल सायंकाळी सहा वाजता दिली असती तर काय झाले असते. या शर्यतीसाठी सातारा ,जत, सांगली आष्टी, अहमदनगर येथून बैलगाडा मालक आले आहेत. शर्यतीची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर शर्यतीला अवघे काही तास उरले असताना प्रशासनाने ही स्थगित दिली आहे. जर मागील तीन दिवसांपासून पोलीस प्रशासन इथे येऊन पाहणी करतेय. सर्व तयारी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने आम्ही संपर्कात होतो. मात्र तरीही आम्हाला माहिती न देता रात्री शर्यतीला स्थगिती दिली जातेय, असे का ? दुसरीकडं पुणे जिल्ह्यातच भीमा -कोरेगाव येथील शौर्य दिन साजरा होत आहे त्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येतेय मग बैलगाडा शर्यतीला का नाही ? असा सवाल आढळराव पाटील यांनी विचारला आहे.

दोन ठिकाणे होणार होत्या शर्यती सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर पुणे जिल्ह्यात पहिली बैलगाडा शर्यत मावळ आणि आंबेगाव तालुक्यात पार पडणार होती.  शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी या शर्यतीचे आयोजन केलं होतं. या शर्यतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. मात्र बैलगाडा प्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे.

701 बैलगाडा मालक सहभागी 2017 नंतर प्रथम होत असलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल 701 बैलगाडा मालक सहभागी होत आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून बैलगाडा मालक सहभागी होणार होते.

New Year Temple | आस्था, प्रार्थना आणि सुखाचे मागणं, नव वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील आराध्य देवस्थान सजली

Glimpse of LIGER | विजय देवरकोंडाचा जबरदस्त पंच..! लायगरचा टिझर टॉप ट्रेंडिग..!

Uday Samant : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? मंत्री उदय सामंत म्हणाले…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.