AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोयता बाळगल्यास आता खैर नाही, कोयता गँगसंदर्भात पुणे पोलिसांना मिळाले मोठे यश

पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. तसेच कोयता घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले. कोयता बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. 

कोयता बाळगल्यास आता खैर नाही, कोयता गँगसंदर्भात पुणे पोलिसांना मिळाले मोठे यश
Image Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 02, 2023 | 3:26 PM
Share

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत (Terror) कमी होत नाहीय. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याने ही खरी चिंतेची बाब आहे. या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे. दोन दिवसांपुर्वी प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाले. त्यात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (Attack on Student) करण्यात आला आहे. आता पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. तसेच कोयता घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले. कोयता बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.

पुणे शहरातील मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बेकायदेशीर रित्या कोयते बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले आहे. या सर्वांवर मार्केट यार्ड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी भवणसिंग भुरसिंग भादा ( वय ३५), गणेशसिंग हुमनसिंग टाक ( वय ३२) अशी अटक करण्यात केली आहे. या दोघांकडून 18 कोयते आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

कोयता खरेदी-विक्रीसाठी आधारकार्ड बंधनकारक

कोयता गँग म्हणजे चर्चेचा विषय झाला आहे. टवाळखोरांसहित गुंडांच्या मध्ये हातात कोयता घेऊन फिरणे एक प्रकारची पॅशनच सुरू झाली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये कोयता वापर सर्रासपणे केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोयता खरेदी विक्रीसाठी नियम लागू केला आहे. कोयता खरेदी करतांना आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे. दुकानदाराला त्याबाबतची नोंद ठेवावी लागणार आहे.

पुणे पोलिसांचे असं असेल नियंत्रण

कोयता खरेदी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड दुकानदार घेणार आहे.  यामुळे पोलीस कोयता खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याची तपासणी करणार आहे. कोयता खरेदी करण्यामागील कारण काय आहे. त्यामध्ये कुठलाही संशय आल्यास पोलीस थेट कारवाई करणार आहे.

टवाळखोरीला खरोखर आळा बसेल ?

खरंतर पुणे शहरापुरताच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खरेदी करण्याऐवजी ग्रामीण भागात जाऊन टवाळखोर किंवा गुंड कोयता खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे शहरात अटी घालण्यात आल्या असल्या तरी धुमाकूळ घालणाऱ्यांना यानिमित्ताने चाप बसेल की नाही याबद्दल शंका आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच