AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Bandh: पुण्यात व्यापाऱ्यांचा विरोध मावळला, महाराष्ट्र बंदला पाठिंबा; दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवणार

Maharashtra Bandh | महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवा, त्यानंतर उघडली तरी चालतील, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजेनंतर दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली.

Maharashtra Bandh: पुण्यात व्यापाऱ्यांचा विरोध मावळला, महाराष्ट्र बंदला पाठिंबा; दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवणार
पुण्यातील दुकाने बंद
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 9:21 AM
Share

पुणे: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवा, त्यानंतर उघडली तरी चालतील, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजेनंतर दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली.

पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद राहणार आहेत. तसा निर्णय पीएमपीएल प्रशासने घेतला आहे. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धावणाऱ्या बसेस दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे 1400 बसेस आज बंद राहणार आहेत.

तर पीएमपीएल डेपोवर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहेत. स्वारगेट बस डेपो बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, दत्ता सागरे, भाऊ करपे रस्त्यावर बसून आंदोलन केलं.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा बंदला पाठिंबा

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल (9 ऑक्टोबर) तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे. संबंधित बातम्या:

Maharashtra bandh live updates | मुंबईत 8 बसेसची तोडफोड, बेस्टकडून पोलीस संरक्षणाची मागणी

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच यांचा ‘चंदा’, आशिष शेलारांचा हल्लाबोल

तेव्हा तुमचे खासदार शेपूट घालून का बसले होते, मनसेचा एकाचवेळी ठाकरे-पवारांवर हल्ला, बंदला विरोध!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.