Maharashtra Budget 2022 : पुण्यासाठी अर्थसंकल्पातून मांडण्यात आल्या या महत्त्वापूर्ण घोषणा

मुंबई- महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022)नुकताच सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत पुणे जिल्ह्यासाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत. पुण्यासाठी त्यांना या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. का आगामी स्थानिक स्वराच्या संस्थांच्या निवडणूका लक्षात घेत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

Maharashtra Budget 2022 : पुण्यासाठी अर्थसंकल्पातून मांडण्यात आल्या या महत्त्वापूर्ण घोषणा
अर्थसंकल्पातून पुण्यासाठी घोषणा करण्यात आल्या
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:12 PM

मुंबई- महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022)नुकताच सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत पुणे जिल्ह्यासाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत. पुण्यासाठी त्यांना या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. का आगामी स्थानिक स्वराच्या संस्थांच्या निवडणूका(Election)  लक्षात घेत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

  1. लोणावळा येथील टायगर पॉईंटवरून दिसणारे विहंगमय दृश्य पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे, तिथे स्काय वॉक व इतर पर्यटन सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
  2. पुणे व वन विभागात 90 हेक्टरवर बिबट्या सफारी प्रास्तवित असून त्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे.
  3. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या पुण्यातील गंजपेठ येथे ‘फुले वाडा’ या राज्यस संरक्षित राज्य वारसा स्थळ असलेल्या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी विकासासाठी महाविकास आघडी सरकार 100 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आहे.
  4. मावळ तालुक्यातील श्रीसंते जगनाडे महाराजांचे समाधीस्थळ असलेलं संदुबरे या क्षेत्राला तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या संदुबरे तालुका मावळ या क्षेत्राच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचे तरतूद करण्यात आली आहे .
  5. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अंर्तगत राज्यातील महत्त्वाच्या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातीला पुरंदर तालुक्यातील खानवडी या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामूळ गावातील शाळेचा विकास करण्यात येणार आहे. याबरोंबरच सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आलेल्या नायगाव येथील शाळेचाही विकास करण्यातयेणार आहे. या विकास कामासाठी शाळेला 1  एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
  6. पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव या विजयस्तंभासाठी निधेची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी सोयी सुविधांनी युक्त असा स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यक्रमाअंतर्गत हा विकास करण्यात येणार आहे.
  7. अर्थसंकल्पातील दळणवळ या चौथ्या सूत्रानुसार पुणे – पुरंदर रिंगरोड प्रकल्पसाठी 1  हजार 900 हेक्टर जमीनींचे संपादन केले जाणार आहे. त्यासाठी 1 हजार 500  कोटी नियतव्यय प्रस्थावित असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
  8. पुण्यातील मेट्रो प्रकल्प स्वारगेट ते पिंपरी चिंचवड , वनाझ ते रामवाडी या मार्गिका पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. पुणे म्हणाग्र प्रदेशविकास प्राधिकरणाने हिंजवडीतील राजीव गांधी आयटीपार्कपासून शिवाजीनगरला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्प लाईन -3 या प्रकल्पाचे काम सुरु केलं आहे. या उन्नत मेट्रोची लांबी 23 किमी आहे. एकूण प्रकल्पाची किंमत 8 हजार 313 कोटी आहे.

भंडाऱ्यातील जवानाचा कुपवाडा येथे वाहन अपघातात मृत्यू! जम्मू काश्मीरमध्ये होता कार्यरत

हायड्रोजेल तंत्रज्ञानामुळे शेतीव्यवसायात अमूलाग्र बदल, सिंचनाचा प्रश्न मार्गी अणखी बरेच काही

IND vs SL: अश्विनच्या निशाण्यावर कपिल देवनंतर अनिल कुंबळेचा विक्रम, श्रीलंकेविरुद्ध बंगळुरूमध्ये मोठी संधी!

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.