महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: दौंड तालुक्यातील कुसेगावात बाचाबाची, पोलिसांकडून लाठीचार्ज

| Updated on: Jan 15, 2021 | 7:44 PM

Maharashtra Gram Panchayat Elections 2021: दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये निवडणुकीला गालबोट लागले असून दोन गटात भांडण झाल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला. (Daund Kusegaon Police Lathi charge)

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: दौंड तालुक्यातील कुसेगावात बाचाबाची, पोलिसांकडून लाठीचार्ज
Follow us on

पुणे : राज्यातील 14 हजार 232 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाची प्रक्रिया सुरु असताना काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागल्याच्या घटना समोर येत आहेत. दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये मतदान प्रकियेला गालबोट लागल्याची माहिती आहे. गावातील दोन गट एकमेकांना भिडल्यानं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. दौंड तालुक्यातील 48 गावामध्ये मतदान होत आहे. (Maharashtra gram panchayat elections 202 Daund Kusegaon two Groups turmoil police lathi charge on mob)

कुसेगावात दोन गटातील बाचाबाचीचे रुपांतर वादात

दौंड तालुक्यातील कुसेगावात ग्रामंपचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. मतदानाची प्रक्रिया सुरु असताना कुसेगावातील दोन गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यानंतर दोन गटांतील तुफान बाचाबाचीचे रुपांतर वादात झाल्यानं पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जमाव पांगला असून मतदान प्रक्रिया सुरळीत झाली आहे.

कुसेगावात दोन गटात बाचाबाची

पुणे जिल्ह्यात 649 गावांमध्ये मतदान

पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायत साठी आज निवडणूक होत आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक ह्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यामुळे काही ठिकाणी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला होता त्याठिकाणी प्रशासक नेमण्यात आले होते आज जिल्ह्यात निवडणूक होत आहे प्रत्येक्षात 11 हजार 07 उमेदवार रिंगणात आहे जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

जळगावातील जामनेरमध्येही निवडणुकीला गालबोट

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलं आहे. जामनेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून रात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे चाकू हल्ला झाला आहे. पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा प्रकार देखील घडला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

गुरूवारी मध्यरात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून मध्यरात्री वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले.


संबंधित बातम्या:

Gram Panchayat Elections | तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? कसं चेक करालं?

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: जामनेरच्या देवपिंप्रीत चाकू हल्ला, पिस्तूल रोखून धमकावलं