AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Elections | तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? कसं चेक कराल?

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.  (How to Check Name In Voter List)

Gram Panchayat Elections | तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? कसं चेक कराल?
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:20 PM
Share

मुंबई : कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच राज्यात निवडणुका होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. (How to Check Name In Voter List)

संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज मतदानाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. मतदानाचा दिवस हा लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस मानला जातो. पण मतदार म्हणून आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही (Voter List Name check) , हे तपासून घेणं, ही आपली जबाबदारी आहे. याचं कारण मतदान करणं आपला हक्क आहे. त्यामुळे मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

?तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा?

?सर्वप्रथम http://103.23.150.139/marathi/ या साईटवर क्लिक करा.

?तुम्हाला Name Wise आणि ID Card Wise असे दोन पर्याय दिसतील.

➡️पहिला पर्याय :

?तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन District पर्यायावर क्लिक केल्यास – त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

?तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन Assembly पर्यायावर क्लिक केल्यास – त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, मतदारसंघाचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल. (How to Check Name In Voter List)

➡️दुसरा पर्याय :

तुम्ही ID Card Wise या पर्यायावर क्लिक करुनही तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते तपासू शकता. त्यासाठी ID Card Wise केल्यानंतर जिल्हा निवडावा लागेल, त्यानंतर मतदान ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल आणि दिलेल्या संख्येची बेरीज टाकावी लागेल, त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

?मतदार यादीत तुमच्या नावाचे अनेक पर्याय दिसल्यास काय कराल??

सर्व माहिती भरल्यानंतर अनेकदा एकाच नावाचे अनेक पर्याय दिसतात. अशावेळी तुमचा गोंधळ होऊ शकतो. मात्र, गोंधळण्याचं कारण नाही. तुम्हाला जर अनेक नावं दिसली, तर त्या नावांच्या पुढे VIEW PDF नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक पीडीएफ फाईल उघडेल, त्यात सर्वात खाली तुम्हाला तुमचा पत्ता दिसेल. त्यावरुन तुम्हाला लगेच लक्षात येईल, अनके पर्यायांमधील नेमकं तुमचं नाव कोणतं.

एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व माहिती इंग्रजीत भरावयाची आहे. त्यामुळे स्पेलिंग चुकता कामा नये. स्पेलिंग चुकल्यास अर्थात तुमचं नाव शोधताना अडचण येईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. (How to Check Name In Voter List)

संबंधित बातम्या : 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता सेटिंग्ज सुरू

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.