AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC Results 2022 : धाकधुक वाढली! दुपारी एक वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर

एसएमएस आणि संकेतस्थळाशिवाय टीव्ही 9 डिजीटलवरही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. रिझल्ट आपल्या www.tv9marathi.com वर घोषित होणार आहे. तुम्ही सर्वात आधी आपला निकाल आपल्या संकेतस्थळावर पाहू शकता.

Maharashtra HSC Results 2022 : धाकधुक वाढली! दुपारी एक वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर
बारावीचा निकाल (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 1:29 PM
Share

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा पुणे : बारावी अर्थात एचएससीचा निकाल आज लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Results 2022 Date) याच आठवड्यात लागणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले होते. साधारणपणे 8 किंवा 9 जून रोजी बारावीचा निकाल (HSC Result Live) लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार आज (8 जून) हा निकाल जाहीर होणार आहे. निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकतीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. दुसरीकडे ऑनलाइन-ऑफलाइन या गोंधळात विद्यार्थ्यांनी (HSC result News) परीक्षा दिली होती. त्यामुळे आता आजचा निकाल काय लागतो, याची धाकधूक विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील आहे.

एसएमएसद्वारे पाहा निकाल

राज्य शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना मेसेजच्या माध्यमातून तो पाहता येणार आहे. त्यासाठी टाइप करावे लागेल MHHSC आसन क्रमांक त्यानंतर 57766 या नंबरवर तो पाठवावा लागेल. त्यानंतर निकाल तुम्हाला मोबाइलवर पाहता येणार आहे. काही वेळानंतर अधिकृतरित्या संकेतस्थळावरही तो पाहता येणार आहे.

कसा पाहणार बारावीचा निकाल?

1. निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या संकेतस्थळावर जावे

2. संकेतस्थळावरील उपलब्ध रिझल्ट लिंकवर क्लिक करावे

3. आपला रोल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि शाळेचा कोड टाकून सबमिट करावे

4. त्यानंतर निकाल ओपन होईल

5. विद्यार्थी त्यांचा निकाल स्क्रीनवर पाहू शकतील.

टीव्ही 9 डिजीटलवरही निकाल पाहता येणार

एसएमएस आणि संकेतस्थळाशिवाय टीव्ही 9 डिजीटलवरही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. रिझल्ट आपल्या www.tv9marathi.com वर घोषित होणार आहे. तुम्ही सर्वात आधी आपला निकाल आपल्या संकेतस्थळावर पाहू शकता. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून निकालीची घोषणा झाल्यानंतर तुम्हाला tv9 Marathiच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्याठिकाणी आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल मिळणार आहे. यामुळे संकेतस्थळ हँग झाले किंवा रांगेत ताटकळत उभे राहून निकालाची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. tv9 marathiच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि काही क्षणात निकाल मिळवा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.