Maharashtra Lockdown: ‘पुण्यात 1 जूनपासून सरसकट सगळीच दुकानं उघडायला परवानगी देऊ नका’

दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता पुण्यात सरसकट अनलॉक योग्य ठरणार नाही. | Maharashtra Lockdown Pune

Maharashtra Lockdown: 'पुण्यात 1 जूनपासून सरसकट सगळीच दुकानं उघडायला परवानगी देऊ नका'
1 जूनपासून सरसकट सगळीच दुकानं उघडू नका
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 7:34 AM

पुणे: येत्या 1 जुनपासून पुण्यात सरसकट अनलॉक करु नका, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांनी मांडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता एकाच झटक्यात सर्वकाही अनलॉक (Unlock) करणे योग्य ठरणार नाही. सर्व दुकाने एकाचवेळी उघडण्यास परवानगी देता कामा नये, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. (Pune Mayor Murlidhar mohol on unlocking in Pune)

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता पुण्यात सरसकट अनलॉक योग्य ठरणार नाही. येत्या शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आपण ही भूमिका मांडू, असे मोहोळ यांनी सांगितले. पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असली तरी तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही. त्यामुळे टप्प्याटप्याने अनलॉक करणे गरजेचे आहे. सुरुवातीला फक्त शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवायला परवानगी द्यावी. त्यानंतर हळहळू सुट द्यावी, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

‘आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या’

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती राज्यातील व्यापारी समाजाने ठाकरे सरकारला केली आहे.

पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जुनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जुनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटले होते.

‘आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणारच’

ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही 1 जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel)  यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात. त्यांना राज्याच्यादृष्टीने काय चांगला निर्णय घ्यायचाय तो घेऊ दे. पण औरंगाबादसाठी आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही. आम्ही 1 जुनपासून दुकानं उघडणारच, असे इम्तियाज जलील यांनी ठणकावून सांगितले.

संबंधित बातम्या:

‘मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ‘ज्ञान’ देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणारच’

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

(Pune Mayor Murlidhar mohol on unlocking in Pune)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.