AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भ्रष्टाचारात कोणते शहर ठरले अव्वल, पुणे-मुंबई कोणत्या क्रमांकावर

national crime records bureau : नॅशनल क्राइम ब्युरो २०२२चा अहवाल आला आहे. या अहवालानुसार भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात टॉपमध्ये आहे. तसेच दंगलीचे प्रकरणेही महाराष्ट्रात सर्वाधिक घडली आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील परिस्थिती चिंता निर्माण होणारी आहे.

भ्रष्टाचारात कोणते शहर ठरले अव्वल, पुणे-मुंबई कोणत्या क्रमांकावर
ACB
| Updated on: Dec 09, 2023 | 12:13 PM
Share

योगेश बोरेस, पुणे | 9 डिसेंबर 2023 : राज्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) गेल्यानंतर कारवाई केली जात आहे. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील अभियंता अमित गायकवाड याला एक कोटींची लाच घेताना पकडण्यात आले. त्याचा सहकारी गणेश वाघ अजूनही फरार आहे. एसीबीकडून राज्यात कारवाई होत असते. परंतु त्यानंतर लोकप्रतिनिधीवर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रकार अगदी नगण्य आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात टॉपमध्ये आहे. यासंदर्भात नॅशनल क्राइम ब्युरो २०२२चा अहवाल आला आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे.

कोणते शहर पहिल्या क्रमांकावर

राज्यात ९४९ भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. देशात हे सर्वाधिक गुन्हे आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील आकडेवारीनुसार भ्रष्टाचारात राज्यात नाशिक शहर पहिल्या क्रमांकावर आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि देशातील सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराने भ्रष्टाचारात आघाडी घेतील आहे. पुणे शहर भ्रष्टाचाराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीप्रमाणे भ्रष्ट्राचारातही पुणे मागे नसल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचारामध्ये गेल्या वर्षी पुणे राज्यात पहिल्या क्रमांकावर होते. तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दंगलीमध्ये महाराष्ट्र अव्वल

देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात 8,218 दंगलीचे गुन्हे नोंदवण्यात आले. नॅशनल क्राइम ब्युरो २०२२चा अहवालात ही माहिती देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत नॅशनल क्राइम ब्युरोचे काम चालते. खून आणि हत्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये महाराष्ट्रात 2,295 खून झाले होते. महाराष्ट्रात बलात्काराची 2,904 प्रकरणे घडली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.