VIDEO | पुण्यात गॅरेजमध्ये भीषण आग, दोन बस जळून खाक, दोघे गंभीर जखमी

पुण्यातील उत्तमनगर भागातील कोपरे गाव येथे बस दुरुस्ती करणारे मोठे गॅरेज आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गॅरेजमध्ये अचानक आग लागून दोन बस जळून खाक झाल्या

VIDEO | पुण्यात गॅरेजमध्ये भीषण आग, दोन बस जळून खाक, दोघे गंभीर जखमी
पुण्यातील गॅरेजमध्ये आग भडकून बस जळून खाक
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 8:10 AM

पुणे : पुण्यात गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत दोन बस जळून खाक (Pune Garage Bus Fire) झाल्या, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोपरे गावातील खाजगी बस गोडाऊनमध्ये आग भडकल्याची माहिती आहे. आगीच्या घटनेचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील उत्तमनगर भागातील कोपरे गाव येथे बस दुरुस्ती करणारे मोठे गॅरेज आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गॅरेजमध्ये अचानक आग लागली. यामध्ये गॅरेजमधील गाड्यांचे मोठे नुकसान झाले. पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.

गॅरेजच्या आगीत दोन खासगी बस जळून खाक झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO: परळी-बीड-नांदगाव मार्गावरील बसचा येवल्यात अपघात, 42 जण जखमी, 2 गंभीर

Pune Fire : केमिकल कंपनीत 15 महिलांसह 18 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?