VIDEO: परळी-बीड-नांदगाव मार्गावरील बसचा येवल्यात अपघात, 42 जण जखमी, 2 गंभीर

नांदगाव आगाराच्या परळी-बीड-नांदगाव या एसटी बसला येवल्यातील राजापूर येथे अल्टो कारने समोरासमोर धडक दिल्या मोठा अपघात झाला.

VIDEO: परळी-बीड-नांदगाव मार्गावरील बसचा येवल्यात अपघात, 42 जण जखमी, 2 गंभीर


नाशिक : नांदगाव आगाराच्या परळी-बीड-नांदगाव या एसटी बसला येवल्यातील राजापूर येथे अल्टो कारने समोरासमोर धडक दिल्या मोठा अपघात झाला. ही बस येवल्याकडून नांदगाव येथे जात असताना नांदगाव येथून येणाऱ्या कारने एसटी बसला धडक दिली. यात अल्टो कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत, तर एसटीमधील 40 प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (7 ऑगस्ट) सायंकाळी घडली आहे.

विशेष म्हणजे हा अपघात किती भीषण होता हे अपघातानंतरच्या वाहनांच्या स्थितीवरुन पाहता येतंय. अल्टो कार रस्त्याच्या मधोमध उभी असल्याचं पाहायला मिळालं. या अल्टो कारची समोरची बाजू जोरदार धडकेमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. एसटी बस देखील कारच्या धडकेने नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली उतरली. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात केली. त्यामुळे बसलेल्या झटक्यात बसचं पुढील चाक खराब झालं.

गंभीर जखमींवर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा :

बस आणि पिकअप चालकाचा वाद प्रवाशाच्या जीवावर, ट्रक धडकल्याने बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

महामंडळाच्या भंगार बस प्रवाशांच्या जीवावर, एसटी नदीत कोसळता कोसळता वाचली

VIDEO | बाईकच्या धडकेनंतर आग, पुण्यात सीएनजी बस जळून खाक

व्हिडीओ पाहा :

Parali Beed Nandgaon ST bus accident in Yeola Nashik

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI