राज्यात कोरोना मृत्यूचं थैमान, पुणे महापालिकेत सर्वाधिक मृत्यू, गेल्या 5 दिवसातील आकडेवारी काय?

Namrata Patil

|

Updated on: Apr 29, 2021 | 9:15 AM

सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. (Maharashtra Record Highest Corona Death) 

राज्यात कोरोना मृत्यूचं थैमान, पुणे महापालिकेत सर्वाधिक मृत्यू, गेल्या 5 दिवसातील आकडेवारी काय?
Death
Follow us

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. काल राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 67 हजार 214 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. (Maharashtra Record Highest Corona Death)

राज्यात काल दिवसभरात 985 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे पुणे महापालिकेत झाले आहेत. पुणे महापालिकेत दिवसभरात 117 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापाठोपाठ ठाणे आणि मुंबई महापालिकेत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना मृत्यूचं थैमान

तर दुसरीकडे गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही सातत्याने वाढत आहे. काल राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे वाढते कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आलीय. त्यामुळे कोरोनाचं हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे.

राज्यात सर्वाधिक मृत्यू झालेली ठिकाणं

  • पुणे पालिका – 117
  • ठाणे पालिका – 92
  • मुंबई पालिका – 78
  • औरंगाबाद – 80
  • नागपूर पालिका – 69
  • नंदुरबार – 43

गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्या

28 एप्रिल – 985 27 एप्रिल – 895 26 एप्रिल – 524 25 एप्रिल – 832 24 एप्रिल – 676

राज्यात काल 63,309 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात काल 63,309 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44,73,394 झाली आहे. राज्यात काल 62,181 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आतापर्यंत एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.4 % एवढे झाले आहे.

तर काल राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 67 हजार 214 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे.

तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये

तर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,73,394 (16.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  (Maharashtra Record Highest Corona Death)

संबंधित बातम्या : 

कोरोनाचा हाहाकार! राज्यात 985 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 63,309 नव्या रुग्णांची नोंद

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI