कोरोनाची लक्षणे आढळल्याने आत्महत्या, किचनमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं

कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक (corona patient suicide, ) प्रकार समोर आला आहे.

कोरोनाची लक्षणे आढळल्याने आत्महत्या, किचनमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं
(प्रातिनिधीक फोटो)
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 11:16 AM

बारामती : कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक (corona patient suicide, ) प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ही घटना घडली. कोरोनाची लक्षणे आढळल्याने नैराश्यातून 65 वर्षीय नागरिकाने राहत्या घरात गळफास घेतला. गेल्या चार पाच दिवसांपासून अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याने त्रस्त असलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला कोरोना तपासणी करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. (Man suicide after coronavirus Symptoms at Bhigvan, Indapur near Pune )

प्रकाश विष्णूपंत भगत (वय 65) असं आत्महत्या केल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांना मागील चार-पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळं स्थानिक रुग्णालयात त्यांना कोरोना तपासणी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी काल भिगवण येथील त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाबद्दल भीती मनात न ठेवता तातडीने तपासणी करून उपचार करावेत असं आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केलं आहे.

अंबाजोगाईत एकाचवेळी 28 जणांवर अंत्यसंस्कार

बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका फटका बसत आहे. बीडच्या अंबाजोगाईत 30 जणांचा काल एका दिवसात मृत्यू झाला आहे. यातील 28 जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली. त्यामुळे कोरोनाचे हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील कोरोनाचा ताजी आकडेवारी, तुमच्या जिल्ह्यात किती अॅक्टिव्ह रुग्ण

कोरोनाचे मृत्यूतांडव, अंबाजोगाईत एकाचवेळी 28 जणांवर अंत्यसंस्कार  

VIDEO: यवतमाळमध्ये एकाच वेळी 26 चिता पेटल्या, आप्तेष्ट स्पर्शही करायला तयार नसताना अंत्यसंस्कार करणाऱ्यांची बातमी 

(Man suicide after coronavirus Symptoms at Bhigvan, Indapur near Pune )

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.