AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंनी उपचार, पाणी सोडले… विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, मला धक्का…

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पाणी व उपचार घेण्यास नकार देत आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला असून, त्यांनी जरांगेंना असे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. सरकार मराठा आरक्षणावर कायदेशीर कार्यवाही करत असून, ओबीसींच्या हक्कांना धक्का लागणार नाही याची ग्वाही विखे पाटलांनी दिली.

जरांगेंनी उपचार, पाणी सोडले... विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, मला धक्का...
radhakrishna vikhe patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 3:50 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे. सुरुवातीला आमरण उपोषण केल्यानंतर त्यांनी पाणी घेण्यास आणि सलाईन लावण्यास परवानगी दिली होती. पण सरकारकडून आठ दिवसात कोणतीही कार्यवाही न झाल्याने जरांगे चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी कालपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांना पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगे यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे यांच्या निर्णयाने मला धक्काच बसला, असं विखेट पाटील यांनी म्हटलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारने त्यांच्या सर्वच मागण्यांची दखल घेतली आहे. कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेत निर्णय टिकावा यासाठी काळजी घेऊन अंमलबजावणी करण्यात येत आहे. परवा जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र त्यांनी आज उपचारास नकार दिला. याचा मला धक्का बसला. त्यांनी असं पाऊल उचलू नये. वेळ पडली तर मी आणि अधिकारी पुन्हा त्यांची भेट घेऊ, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही

यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा नेहमी आदर आहे. ओबीसींच्या हक्काला कुठेही धक्का लागणार नाही, ही आमची भूमिका आहे. कोणत्याही अन्य धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता शासन कार्यवाही करणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

जरांगे यांच्या तोंडून कधी कधी त्रास देणारे किंवा अनावधानाने काही शब्द निघतात. मात्र ते समाजासाठी बोलत असतात. त्यामुळे त्यात व्यक्तिगत राग मानायचं कारण नाही. आजपासून शिंदे समितीचा मराठवाड्यात दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न निकाली निघतील, असंही ते म्हणाले.

समान धोरण असावं

यावेळी त्यांनी डीजेबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रश्नावर चर्चा करून सामोपचाराने निर्णय काढला पाहिजे. हिंदूंचे सण आले की बंदीचा विषय येतो. इतर समाजाच्या वेळी चर्चा होत नाही. या दुजाभावाची चीड समाजात आहे. यासाठी समान धोरण आखण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू