Ajit Pawar | कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा… आमचं काही म्हणणं नाही, पण इथं नको – अजित पवार

तळजाई परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पूर्वी या परिसरात सश्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता ते राहिले नाही. मोरांचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे असतं तर 2 - 4 बिबटे आणून सोडले असते. एका रात्रीत कुत्री खलास झाली असती असेही त्यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar | कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा... आमचं काही म्हणणं नाही, पण इथं नको - अजित पवार
ajit pawar
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 10:25 AM

पुणे – ‘इथं पाळीव कुत्री (Pet Dog) घेऊन येऊ नका, कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा. आमचं काही म्हणणं नाही. पण इथं कुत्र्यांमुळ प्रश्न निर्माण होतोय. असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ( Deputy Chief Minister Ajit Pawar)श्वान प्रेमींना लगावला आहे. तळजाई परिसरात भटक्या कुत्र्यांचा (stray dogs) त्रास वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पूर्वी या परिसरात सश्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता ते राहिले नाही. मोरांचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे असतं तर 2 – 4 बिबटे आणून सोडले असते. एका रात्रीत कुत्री खलास झाली असती असेही त्यांनी म्हटले आहे. आता इथं आता कुत्री आणायला बंदी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याचवेळी प्राण्यांसाठी अनाथालय सुरु करतोय, त्यासाठी 22 कोटी मंजूर केलेत. असेही त्यांनी सांगितले.

कोर्टात जाण्याआधी चर्चा करायला हवी

तळजाईवर प्रतिदिन 1 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. त्याला विरोध झाला. आपण 100 रुपयांचे पेट्रोल घालून इथपर्यंत येतो. पण 1 रुपया देणार नाही. पुण्यात लोक खूपच हुशार आहेत लोक लगेच कोर्टात जातात. कुठल्याही गोष्टीला विरोध करण्यापूर्वी थेट कोर्टात जाण्याआधी चर्चा करायला हवी. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. मला पिंपरी चिंचवडमध्ये ही अडचण जाणवली नाही. आपण पक्षीय भेद बाजूला ठेवून चर्चा करायला पाहिजे. अशी टीकाही त्यांनी केली आहे .

देशी झाडांचे प्रमाण वाढायला पाहिजे

पुण्यात मोठ्या प्रमाणात काँक्रेटचे जंगल तयार व्हायला लागलं आहे. तरी सुदैवाने पुण्यात वन विभाग, सरंक्षण खात यांच्या मोठया जागा आहेत. तिथं हिरवाई राहिली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत. तळजाई टेकडीवर कचऱ्याच्या साम्राज्य वाढत असताना, नागरिक कुठेही कचरा टाकत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. नागरिकांची ही कृती योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आधीच्या सरकार मधल्या वनमंत्र्यांनी इथं सु-बाभळीची झाड लावली, जी लावायला नको होती, आता ती झाड काढून दुसरी झाड लावणार. देशी आणि स्थानिक झाड लावली पाहिजेत. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली, विमानाने ऑक्सिजन आणायची तयारी केली होती. पण त्याऐवजी जास्तीत जास्त झाड लावली पाहिजे. निर्सगाला सूट होतील असेच रंग इथं काम करताना वापरले पाहिजेत.

झोपडपट्टी वाढवण्यास प्रोत्साहन देऊ नका

पण दुर्दैवाने काही लोक राजकिय फायद्यासाठी झोपडपट्टी वाढवण्यास प्रोत्साहन देतात. गरिबांना हक्काची घर मिळाली पाहिजे,पण झोपडपट्टी वाढायला नको. त्यासाठी एसआरए सारखे प्रोजेक्ट राबतोय. काही चुकीची बांधकाम झालीत ती काढायला हवीत. मी शुक्रवार, शनिवार पुण्यात असतो. माझ्यामुळे इथल्या अधिकाऱ्यांना ही सकाळी लवकर उठावे लागतं. पण पुणं पाहिजे असेल तर तेवढं करावच लागेल मी सकाळी रोज 1 तास वॉकरवर चालतो नाही तर परिसरात वॉक करतो हेही यानिमिताने त्यांनी सांगितले.

विदर्भातील 41 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, पालक चिंतेत! प्रशासनाने जारी केले हेल्पलाईन नंबर

Russia Ukraine war : युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव; भारत,चीनने मतदान टाळले, काय आहे भारताची भूमिका?

Ukraine ची राजधानी कीवजवळ गोळीबार ; Russia चे 60 सैनिक ठार केल्याचा युक्रेनचा दावा

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.