AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | अजितदादांनी ज्याला सुपारी घेऊन आलाय का विचारलं, तोच निघाला संभाजी छत्रपतींचा माजी पीए

दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यामुळे अजितदादा काहीवेळ भडकले. त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या' केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली, तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला.

Ajit Pawar | अजितदादांनी ज्याला सुपारी घेऊन आलाय का विचारलं, तोच निघाला संभाजी छत्रपतींचा माजी पीए
अजित पवारांचं भावनिक आवाहन
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 5:29 PM
Share

पुणे – अजित पवारांना(Ajit Pawar ) योगेश केदार या तरुणानं मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation)प्रश्न विचारला आहे. मराठ्यांना ओबीसी (OBC)प्रवर्गातून आरक्षण मिळायला हवं ही आमची भूमिका आहे. अजित दादांना आम्ही निवडून दिलंय त्यामुळे आम्ही प्रश्न विचारणार. मुख्यमंत्री जरी इथे आले असते तरी आम्ही जाब विचारला असता. जी उत्तर राजकीय नेते देतायेत ती सगळी थोतांड आहेत. अशी टीकाही योगेश केदार यानं केली आहे.  अजितदादांना प्रश्न विचारणारा व्यक्ती हा खासदार संभाजी छत्रपती यांचा पूर्वीचा पीए होता. आज शिवनेरीवर (shivaneri)शिवजयंतीच्या कार्यक्रमात मराठा आर्कषणावरून काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषय छेडून अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.  ‘दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यामुळे अजितदादा काहीवेळ भडकले. त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या’ केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली, तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला.

आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत.

शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात खडसावले. शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, असा सवालच अजित पवार यांनी केला. आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. त्यांचं आरक्षण रखडवून आम्हाला काय आनंद मिळतो का? काही कायद्याच्या गोष्टी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. आम्ही स्वत: पंतप्रधानांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. सरकारचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. प्रयत्न सुरूच आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं. तसेच ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मराठा तरुणांची मागणीही त्यांनी धुडकावून लावली.

Pandharpur | Vitthal Rukmini मंदिर समितीचे अन्नछत्र पुन्हा सुरू, पहिल्याच दिवशी 2000 भाविकांकडून लाभ

अनेक राजकारणी आणि नेते दाऊदच्या हिटलिस्टवर, मुंबई-दिल्लीसह बड्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट

काय सांगता? दोन वर्षात 14 हजार कांदाचाळींचे नियोजन, असा घ्या अनुदानाचा लाभ अन् कांद्याचे संरक्षण करा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.