AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Mahametro | पुणेकरांना दिलासा ; नवीन वर्षात मेट्रो प्रवास घडण्याची शक्यता

गणेश मंडळाच्या विरोधामुळे मागील काही महिन्यापासून संभाजी पुलावरील काम बंद होते. मात्र महापालिका प्रशासनाने गणेश मंडळासोबत बातचीत केल्यानंतर संभाजी पुलावरील मेट्रोच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. संभाजी पुलावरून गणेश मिरवणुका जात असल्याने मेट्रोच्या पुलाची वाढवण्याची मागणी गणेश मंडळांनी केली होती.

Pune Mahametro | पुणेकरांना दिलासा ; नवीन वर्षात मेट्रो प्रवास घडण्याची शक्यता
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 12:01 PM
Share

पुणे – नव्या वर्षाच्या स्वागताला पुणेकरांना मेट्रोचा प्रवास घडणार आहे. शहरातील वनाझ ते रामवाडी या मार्गावर पहिली मेट्रो धावणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचे काम वेगनवान पातळीवर सुरु आहे. या मार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जुलै महिन्यात मेट्रो चाचणी पार पडली होती. सद्यस्थितीला मेट्रोचे कोच डेपोमध्ये दाखल झाले आहेत. कामचा वेग वाढवत येत्या पंधरा दिवसात काम मार्गी लावण्याचे आदेश मेट्रो प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील डीपीआरच्या कामाला सुरुवात वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. 3 डब्यांच्या 2 मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आला होता. पुणे शहरातील महामेट्रोच्या पहिल्या 33 किलोमीटरच्या टप्प्यापैकी 12 किलोमीटर मार्गाचे काम वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होत असतानाच दुसऱ्या टप्प्यासाठी 113 किलोमीटरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. प्रस्तावित आठ ते नऊ मार्गांवरील ‘डीपीआर’चे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करून 2022 च्या अखेरपर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने   निश्चित करण्यात आले आहे.

गणेश मंडळांचा विरोध मावळला गणेश मंडळाच्या विरोधामुळे मागील काही महिन्यापासून संभाजी पुलावरील काम बंद होते. मात्र महापालिका प्रशासनाने गणेश मंडळासोबत बातचीत केल्यानंतर संभाजी पुलावरील मेट्रोच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. संभाजी पुलावरून गणेश मिरवणुका जात असल्याने मेट्रोच्या पुलाची वाढवण्याची मागणी गणेश मंडळांनी केली होती. मात्र या मागणी मुळे मंत्रोचा खर्चात एवढा होण्याबरोबरच , प्रकल्पाच्या पूर्ततेस वेळ लागणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासन महापालिका व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती. त्यानंतर चालू प्रकल्प आराखड्यात बदल ना कराण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन? महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. नवीन वर्षाता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा होतो आहे. हेच औचित्य साधत वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Bhagat Singh Koshyari’s letter to CM Uddhav Thackeray: तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांचं कडक शब्दात उत्तर, वाचा संपूर्ण पत्र जशास तसं

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

Pune | पुण्यात धुकाची चादर, थंडीचा कडाका कायम

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.