AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमेश वांजळेंचा शेवटचा फोन आला, म्हणाला… काय झालं अखेरचं बोलणं, राज ठाकरेंनी किस्सा सांगताच डोळे पाणावले

मयुरेशला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा असं वाटलं की माझा पुतण्या राहुल ठाकरे आला आहे. तो असाच दिसतो. मग कळलं की मयुरेश आहे. शेवटी लक्षात आले की तो देखील माझा पुतण्याच आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

रमेश वांजळेंचा शेवटचा फोन आला, म्हणाला… काय झालं अखेरचं बोलणं, राज ठाकरेंनी किस्सा सांगताच डोळे पाणावले
राज ठाकरे मयुरेश वांजळे
| Updated on: Nov 15, 2024 | 5:28 PM
Share

Raj Thackeray Ramesh Wanjale : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त 5 दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकासआघाडी आणि मनसेनेही कंबर कसून विधानसभेच्या रिंगणात उतरली आहे. मनसेकडून १२५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मनसेने पुण्यातील तीन महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवार उतरवले आहेत. पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकतंच राज ठाकरेंनी रमेश वांजळे यांचा एक किस्सा सांगितला.

राज ठाकरे यांनी मयुरेश वांजळेसाठी पुण्यात जाहीर प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी रमेश वांजळेंसोबतचा शेवटचा फोन आणि त्यावरील बोलणं याबद्दल सांगितले. आज माझे मित्र सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी प्रचारला आलो. मयुरेशला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा असं वाटलं की माझा पुतण्या राहुल ठाकरे आला आहे. तो असाच दिसतो. मग कळलं की मयुरेश आहे. शेवटी लक्षात आले की तो देखील माझा पुतण्याच आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

“रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल, तर तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो. पण २० मिनिटांनी मला एक फोन आला आणि समोरुन सांगितलं गेलं की तो गेला. मला काय बोलायचं तेच कळेना. मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मी अनेकदा सांगत होतो, की गळ्यातलं वजन काढ, माझ्यासमोर कधी घालत नव्हता”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो

“मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. गोड आणि चांगला मुलगा आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल, तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल. मी जेव्हा निवडणुकांसाठी सर्व गोष्टी ठरवत होतो, तेव्हा मला मयुरेशसाठी सभा घ्यायची होती आणि ती मी घेणारच होतो”, असे राज ठाकरे म्हणाले.

रमेश वांजळे यांचा अल्पपरिचय

मनसेचे आक्रमक नेते आणि आमदार म्हणून रमेश वांजळे यांना ओळखले जाते. रमेश वांजळे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर खडकवासला मतदारसंघातून निवडून आले होते. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून मनसेत दाखल झालेल्या रमेश वांजळे यांनी मोठ्या मताधिक्याने पहिलीच विधानसभा निवडणूक जिंकली होती. रमेश वांजळे यांना सोनं घालण्याची मोठ्या प्रमाणावर हौस होती. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चैन, हातात ब्रेसलेट असल्याने त्यांना गोल्ड मॅन म्हणून ओळखले जायचे. मनसेचा एक आक्रमक आमदार म्हणून रमेश वांजळे हे प्रसिद्ध होते.

रमेश वांजळे यांचा १० जून २०११ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे मनसेने पुण्यातील धडाडीचा आमदार गमावला, अशी लोकभावना होती. वांजळे यांच्या मृत्यूनंतर तब्बल १३ वर्षांनी मनसेनं पुन्हा एकदा रमेश वांजळे यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली आहे. रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता खडकवासल्याचे मतदार आपल्या दिवंगत नेत्याप्रमाणे त्याच्या मुलाची किती साथ देतात? हे पाहावं लागणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.