Raj Thackeray : “शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाही”, पवार-बाळासाहेबांच्या ‘नाईट डिनर’वर राज ठाकरेंचे आसूड

पुणे :  पाडव्याची सभा, भोंगा प्रकरण, ठाण्याची उत्तर सभा, औरंगाबादची सभा, रद्द झालेला अयोध्या दौरा, विरोधकांची टीका या सगळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज काय बोलणार, त्याच्या हिटलिस्टवर कोण असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अश्यात राज ठाकरेंनी भाषणाची सुरूवात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पहिला निशाणा मारत केली. इतकंच […]

Raj Thackeray : शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाही, पवार-बाळासाहेबांच्या 'नाईट डिनर'वर राज ठाकरेंचे आसूड
शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 12:47 PM

पुणे :  पाडव्याची सभा, भोंगा प्रकरण, ठाण्याची उत्तर सभा, औरंगाबादची सभा, रद्द झालेला अयोध्या दौरा, विरोधकांची टीका या सगळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज काय बोलणार, त्याच्या हिटलिस्टवर कोण असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अश्यात राज ठाकरेंनी भाषणाची सुरूवात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पहिला निशाणा मारत केली. इतकंच नव्हे तर त्यांनी पुढे भाषणातही त्यांनी आपल्या शब्दरूपी बाण शरद पवारांवर सोडले. शरद पवार त्यांच्या आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मैत्रीचे अनेकदा दाखले देताना दिसतात. त्यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

पवार-ठाकरे मैत्रीवर भाष्य

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार-ठाकरे मैत्रीचे दाखले दिले जातात. काही मुद्द्यांवर मतभेद आणि राजकीय विरोध सोडता त्यांची मैत्री त्यांनी जपली. पण याच त्यांच्या मैत्रीवर आज राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. “शरद पवार म्हणतात की, हे आताचं महाविकास आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार सांगतात, आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो… तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलीटी घालवताय. शिवसेनेला एवढी देखील अक्कन नाहीये की आपण कुणाबरोबर राहतोय. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. पण हे लोक सत्तेत मशगूल असल्याने यांना कशाचं काही वाटत नाही”, असं राज ठाकरे म्हणालेत.

पवार-ठाकरेंची मैत्री

महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठी घराणी म्हणजे पवार आणि ठाकरे. या दोन्हींचे प्रमुख शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यांत राजकीय विरोध सोडता चांगली मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. शरद पवार स्वत: त्याविषयी बोलत असतात. “आम्ही राजकीय सभांमध्ये एकमेकांचे वाभाडे काढले, टीका टिपण्णी केली. पण आमची मैत्री या सगळ्या पलिकडे होती. दिवसा जरी आम्ही एकमेकांवर तोंड भरून टीका केली तरी, रात्री आम्ही एकत्र जेवायचो. बाळासाहेब माझ्या सर्वात जवळचे स्नेही होते”, असंही पवार सांगत अनेक मुलाखतींमध्ये सांगत असतात.

भाषणातील पहिला बाण पवारांवर

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच पवारांवर टीका करत केली. त्यांनी भाषणासाठी जागा मिळण्यावर भाष्य करताना लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी  साताऱ्यात पावसात केलेल्या भाषणावर खरपूस टीका केली.  “हवामान पाहता कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल मुंबईत पाऊस पडला. पुण्यातही ती शक्यता आहे. पण म्हटलं आता निवडणुका नाहीत तर कशाला उगाच  पावसात भिजत भाषण करा”, असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला. ते पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच इथे बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शरद पवारांना टोला लगावला.

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.