AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापालिकेसाठी मनसेचा स्वबळाचा नारा, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 53 फूट उंचीचं चित्र

पुण्यात आज राज ठाकरे यांच्या भित्तीचित्राचं उद्घाटन करण्यात आलं. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या हस्ते 53 फुट उंचीच्या भित्तीचित्राचं उद्घाटन पार पडलं.

पुणे महापालिकेसाठी मनसेचा स्वबळाचा नारा, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 53 फूट उंचीचं चित्र
Raj Thackeray Painting
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 11:41 PM
Share

पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तस तिसऱ्या लाटेची शक्यताही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशास्थितीत पुण्यात मात्र महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताना पाहायला मिळतेय. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेकडून जागाचं गणित मांडण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेवर स्वबळावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केलाय, तर भाजपनं खासदार गिरीश बापटांवर जबाबदारी सोपवल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंदेखील स्वबळाचा नारा दिला आहे. (MNS will contest Pune municipal corporation election on its own)

पुण्यात आज राज ठाकरे यांच्या भित्तीचित्राचं उद्घाटन करण्यात आलं. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या हस्ते 53 फुट उंचीच्या भित्तीचित्राचं उद्घाटन पार पडलं. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी मनसेनं पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे. मनसेनं यावेळी स्वबळावर पुणे महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांचा पुढचा वाढदिवस महापालिकेत साजरा करणार असल्याचा निर्धार मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, आजच्या कार्यक्रमाद्वारे मनसेनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

शिवसेनेची 80 जागांची मागणी

मुंबईनंतर पुणे महापालिका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असली तरी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर जागांचं गणितच मांडलं आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना 80 जागांवर लढेल, अशी घोषणा संजय राऊत यांनी आठवडाभरापूर्वी केली. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भाजप गिरीश बापटांच्या नेतृत्वात लढणार

दुसरीकडे सत्ताधारी भाजपनेही महापालिका निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे. महापालिका निवडणूक ही खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर त्यांनी नगरसेवकांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे दीड वर्ष वाया गेलं आहे. कोरोना आधी तीन वर्ष नगरसेवकांना काम करण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. आता फक्त सहा महिनेच उरले आहेत. त्यामुळे खुर्ची टाकून बसा. हातात काठी घेऊन काम करा. तरच सत्तेत याल, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा निर्धार

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत 2022 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत असेल असं अनेक जाणकार सांगतात. त्यामुळे शिवसेना आणि भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनंही महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केलाय. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे 2022 मधील पुणे महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालंय.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – ९९ राष्ट्रवादी – ४२ काँग्रेस – १० सेना – १० मनसे – २ एमआयएम – १ एकूण जागा – १६४

सत्ता कुणाची? 23 गावांवर अवलंबून!

2022 मधील पुणे महापालिका निवडणुकीचं चित्र काहीसं वेगळं असेल. कारण महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत शहरात पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्याचबरोबर महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश होणार असल्यामुळे जागा आणि मतदारांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे या २३ गावांचा कौल ज्या पक्षासोबत राहणार तो पक्ष महापालिकेच्या सत्तास्थानी बसेल, असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील: चंद्रकांत पाटील

पुणे महापालिकेवर झेंडा फडकवणार, वर्धापन दिनी राष्ट्रवादीचा निर्धार

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...