AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचा मोठा निर्णय ‘; पक्षात महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य

मनसेच्या माजी नगरसेवक रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज 140 महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहे. शहरातील पक्ष कार्यालयात ही पत्रे देण्यात आली.

रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचा मोठा निर्णय '; पक्षात महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य
Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 1:33 PM
Share

पुणे – रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवा निर्माण सेनेला रामराम केल्यानंतर आता मनसेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीता पक्ष संगठन बळकट करण्यासाठी विविध गोष्टी ककेल्या जात आहेत. मनसेच्या माजी नगरसेवक रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज 140महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहे. शहरातील पक्ष कार्यालयात ही पत्रे देण्यात आली.

पक्षाला मोठा झटका

खळखट्याक करणाऱ्या नेत्या म्हणून रुपाली पाटील यांची ओळखलया जात होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला राजीनामा दिल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना त्यांनी पक्ष सोडल्याचा फटका मनसेला बसणार आहे. पाटील यांची नाराजी दूर होईल असं सांगितलं जातं असतानाच राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली पक्षातील नाराजी नेत्यांवर असलेली नाराजी उघड केली. पक्षातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज असल्याचे सांगत , या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकर परिषदेत केली आहे.

काय आहे वाद रुपाली पाटील व मनसेच्या नेत्यांमध्ये समीर वानखेडे प्रकरणावरून वाद निर्माण झाला. समीर वानखेडे प्रकरणावर रुपाली पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हा वाद सुरु झाला त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते की, ‘समीर वानखेडे यांनी दलितांवर अन्याय केल्याचे आरोप होत आहेत तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यावरून पक्षाचे उपनेते बाबू वागस्कर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद झाला होता. प्रवक्ते पद नसताना रूपाली पाटील यांनी पक्षाच्या भूमिका मांडायला नको असं वागस्कर यांचं म्हणणं होतं. मात्र रुपाली पाटील यांनी त्याला जोरदार विरोध केला. वागसकर यांच्या पत्नीलाच शहराध्यक्ष पद देऊन माध्यमांना केवळ त्यांच्याशीच बोलावं असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे रूपाली पाटील कमालीच्या दुखावल्या होत्या. आपण सगळ्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या मात्र त्यावर काहीही कारवाई झाली नाही. यामुळंच त्यांनी आपला राजीनामा दिला व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Kidney Stones | पोटदुखीचा त्रास, शिक्षकाच्या पोटात निघाले एक-दोन नव्हे, तब्बल 156 किडनी स्टोन्स

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.