AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bullet Train | पुणे शहरातून जाणार बुलेट ट्रेन, कोठून कुठे असणार या हायस्पीड ट्रेनचा मार्ग

Mumbai-Hyderabad Bullet Train | मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. त्याचवेळी देशातील सात मार्गांवर बुलेट ट्रेन सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यातील एक मार्ग पुणे शहरातून जाणार आहे.

Bullet Train | पुणे शहरातून जाणार बुलेट ट्रेन, कोठून कुठे असणार या हायस्पीड ट्रेनचा मार्ग
Bullet TrainImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 18, 2023 | 2:09 PM
Share

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. या मार्गावरील काही स्टेशन काम झाले. मुंबईत अंडरगाऊंड स्टेशन तयार केले जात आहे. या मार्गावर असलेल्या पुलांचे काम सुरु आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 24 पूल असून त्यातील 20 पूल गुजरातमध्ये तर 4 पूल महाराष्ट्रात तयार केले जात आहे. या मार्गात असणाऱ्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. त्याचवेळी नवीन रेल्वे मार्गाची चाचपणी सुरु झाली आहे.

कोणत्या मार्गावर सुरु झाला अभ्यास

मुंबई, अहमदाबादनंतर देशातील सात मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यात मुंबई, हैदराबादचा 709 किलोमीटर बुलेट ट्रेनचा समावेश आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल दाखल झालेला आहे. भारताच्या नॅशनल रेल प्लॅनने म्हणजेच NRP हाय-स्पीड ट्रेनसाठी नवीन मार्ग शोधले आहे. एकूण सात मार्गांसंदर्भात चर्चा सुरु आहे. यानंतर देशाच्या रेल्वे नेटवर्कमध्ये क्रांतिकारी बदल होणार आहे. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि बेंगळुरू जोडले जाणार आहे.

पुणे शहरातून जाणार बुलेट ट्रेन

मुंबई, हैदराबाद हायस्पीड रेलमार्गावर पुणे स्टेशन असणार आहे. हा मार्ग मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी या मार्ग हैदराबादमध्ये जाणार आहे. या रेल्वेचा कमाल वेग 350 किमी प्रतितास असणार आहे. सर्व काही सुरळीत झाले तर 2041 मध्ये या मार्गावर बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी लोकसभेत या मार्गासंदर्भात माहिती दिली होती.

वंदे भारत पुण्यावरुन

सध्या सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत ट्रेन पुणे शहरातून जात आहे. मुंबई-सोलापूर असलेल्या या ट्रेनला पुणे स्थानकावर थांबा दिल्या आहेत. पुणेकरांकडून या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता त्यानंतर बुलेट ट्रेन सुरु झाल्यास पुणेकरांना त्यांचा चांगलाच फायदा होणार आहे. तोपर्यंत पुणे येथील पुरंदर नवीन विमानतळ सुरु होण्याची शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.