AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime |आधी गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावले अन… ; पुणे पोलिसांनी उघड केले धक्कादायक वास्तव

अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि नंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी उकळण्याचा धंदा राजस्थानातील अनेक गावात सुरु असल्याचे अनेकदा ऐकले होते. मात्र चक्क पुणे राज्याच्या इतर भागातही या घटना घडत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

Pune crime |आधी गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावले अन... ; पुणे पोलिसांनी उघड केले धक्कादायक वास्तव
Cyber Crime
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 3:57 PM
Share

पुणे – शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडं तरुणांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इतकच नव्हेतर यासाठी चक्क टोळीच सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील एका तरुणाला एका तरुणीने व्हिडिओ काॅल केला. त्याच्याशी बोलून संपर्क वाढविला. आपण प्रेमात पडल्याचे भासवून त्याला कपडे उतरविण्यास भाग पाडले. या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग या टाेळीने केले. त्यानंतर या तरुणाला खंडणीसाठी फोन यायला सुरुवात झाली. तुझ्या सगळ्या मित्रांच्या सोशल मीडियावर (Social media) हे व्हिडिओ टाकू, अशी धमकीही दिल्याचे उघड झाले आहे. सायबर पोलीस (cyber Police )ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले की, सेक्सटॉर्शनच्या ( sextortion)तक्रारी वाढू लागल्यानंतर त्याचा तपास करीत असताना राजस्थानमधील गावांची नावे अधिक आढळून आली.

राजस्थानात गेल्यावर ही बाब आली समोर पुणे पोलीस दलाचे पथक तपासासाठी राजस्थानात गेल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि नंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे व्हिडिओ काॅल पाठवून खंडणी उकळण्याचा धंदा राजस्थानातील अनेक गावात सुरु असल्याचे अनेकदा ऐकले होते. मात्र चक्क पुणे राज्याच्या इतर भागातही या घटना घडत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांप्रमाणे अन्य राज्यातील पोलीस पथके या ठिकाणी तपासासाठी येऊन गेल्याची माहिती पुणे पोलीस पथकाला मिळाली होती. स्थानिक नागरिकांचा असहकार, स्थानिक पोलिसांचे मिळत नसलेले सहकार्य यामुळे या आरोपींना शोधून त्यांना ताब्यात घेणे अवघड जाते. त्याचबरोबर अनेक तक्रारदार सुरुवातीला तक्रार देतात. पण, पुढे त्यांचा त्रास बंद झाला की ते प्रत्यक्ष फिर्याद देत नाही. त्यामुळे अशा सायबर चोरट्यांचे फावते आहे.

नातेवाईक, परिचितांची  माहिती गोळा

एखाद्याची फसवणू करणयासाठी या टोळीकडून आधी संबंधित पीडित व्यक्तीची माहिती मिळवली जाते. शिकार बनविण्याच्या अगोदर सोशल मीडियावरून या व्यक्तीची आणि त्याच्या नातेवाईक, मित्र परिवाराची सगळी माहिती ही टोळी गोळा करते. त्यांचे नाव घेऊन त्यांना हा व्हिडिओ पाठवू का, अशी धमकी दिली जाते. अनेक मान्यवर, राजकीय कार्यकर्ते यांनाही अशा प्रकारे जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न अनेकदा झाले आहेत. या टोळीकडून होतोय जमताराच्याच मॉडेलचा वापर केला जात आहे.

‘इरफान भाई मला नेहमी सांगायचे, अपना टाइम आयेगा’, टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ 26 वर्षाचा मुलगा झाला भावूक

नोकरीच्या शोधात असलेल्या विपुलसारख्या पदवीधारकांच्या बजेटकडून कोणत्या अपेक्षा आहेत ?

थंडीनं कुडकुडत होती चिमुरडी, देवदूत बनून एकानं केली मदत; हृदयस्पर्शी Video Viral

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.