AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune NCP : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कसली कंबर; अॅपही केलं लॉन्च!

पालिका निवडणुका (Election) जसजशा जवळ येवू लागल्या आहेत, तसतशी राजकीय पक्षांची (Political Parties) लगबग सुरू झाली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) शनिवारी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी विधानसभानिहाय बैठका घेतल्या होत्या.

Pune NCP : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कसली कंबर; अॅपही केलं लॉन्च!
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारीImage Credit source: tv9
| Updated on: Apr 18, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : पालिका निवडणुका (Election) जसजशा जवळ येवू लागल्या आहेत, तसतशी राजकीय पक्षांची (Political Parties) लगबग सुरू झाली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) शनिवारी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी विधानसभानिहाय बैठका घेतल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी बैठका आयोजित केल्या होत्या. त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वेळी आमंत्रित केले आणि त्यांना बूथ समित्या मजबूत करण्यास आणि मतदार यादीचा तपशीलवार अभ्यास करण्यास सांगितले होते. पवार आणि पाटील म्हणाले, की आमच्या बूथ समित्या मजबूत केल्या तर पुणे शहराचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल.

‘नागरिक केंद्रित योजना राबवण्यावर भर’

पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, की सर्व सभा बंद दाराआड होत्या, माध्यमांना परवानगी नव्हती. आम्ही क्षेत्रनिहाय समस्या, कमकुवतपणा आणि आमचे मजबूत मुद्दे यावर चर्चा केली. कार्यकर्त्यांना थेट नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. पवार म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार विविध निर्णय घेत असून नागरिक केंद्रित योजना राबवत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता सरकारचे ब्रँड अॅम्बेसेडर बनणे आणि yjr मतदारांना माहिती देणे आवश्यक आहे.

अॅपही केले लाँच

राष्ट्रवादीने शनिवारी अॅपही लाँच केले. या अॅपचा मुख्य उद्देश शहरी समस्या आणि लोकांच्या अपेक्षा समजून घेणे हा आहे. एकदा डेटा संकलित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यानुसार धोरणे तयार करणार आहे. एकूणच शहरात राष्ट्रवादीचा महापौर बनविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने कंबर कसली असून कार्यकर्त्यांचा नेत्यांशी थेट संवाद घडवून आणत तयारीला सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाचाही आधार यानिमित्ताने घेण्यात येत आहे.

आणखी वाचा :

Ganesh Naik case : इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गणेश नाईकांवर गुन्हा दाखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

Raj Thackeray Vs Ajit Pawar : मशिदींवरच्या भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका ‘जशास जशी’; तर अजित पवार म्हणतात…

Baramati : गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लांखांचं बक्षीस? काय म्हणाले कामगार नेते?

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.